चित्रकूट : शेतकऱ्यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्डअंतर्गत शेतक-यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली. यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत २५ लाख लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील २,००० पेक्षा अधिक बँक शाखांना शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: क्रेडिट कार्ड शेतक-यांना वितरित केले.
पीएम- किसान सन्मान निधीअंतर्गत शेतक-यांना वार्षिक ६,००० रुपये देण्यात येतात. देशातील अनेक भागातील शेतकरी सावकार वा अन्य मार्गाने चढ्या दराने कर्ज घेतो. या सावकारांच्या जाचातून शेतकºयांची सुटका करण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचलले आहे.
>शेतक-यांना कसे मिळेल कर्ज ?
शेतक-यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने हे कर्ज मिळेल. भारतीय स्टेट बँकेच्या सूत्रांनुसार, जर शेतकºयांनी कर्ज वेळेवर परत केले, तर व्याज ३ टक्क्यांपर्यंत माफ. कर्ज परतफेडीस उशीर झाल्यास बँक ७ टक्के दर आकारेल. जर शेतकºयांनी वेळेवर कर्ज परतफेड केली, तर कर्ज मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढेल. १.६० लाखासाठी तारणाची आवश्यकता असणार नाही.
किसान क्रेडिट कार्ड : शेतकऱ्यांना ४ टक्के दराने ३ लाखांपर्यंत कर्ज
किसान क्रेडिट कार्डअंतर्गत शेतक-यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 06:06 AM2020-03-01T06:06:38+5:302020-03-01T06:07:05+5:30