Lokmat Money > बिझनेस न्यूज > Kisan Vikas Patra : सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! आधीपेक्षा दुप्पट होतील पैसे...

Kisan Vikas Patra : सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! आधीपेक्षा दुप्पट होतील पैसे...

Kisan Vikas Patra : गेल्या काही दिवसांत सरकारकडून किसान विकास पत्र (KVP) यासह काही सरकारी योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 08:53 AM2022-10-31T08:53:08+5:302022-10-31T08:53:46+5:30

Kisan Vikas Patra : गेल्या काही दिवसांत सरकारकडून किसान विकास पत्र (KVP) यासह काही सरकारी योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

kisan vikas patra invest in kvp and get double money in 123 months | Kisan Vikas Patra : सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! आधीपेक्षा दुप्पट होतील पैसे...

Kisan Vikas Patra : सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! आधीपेक्षा दुप्पट होतील पैसे...

नवी दिल्ली : तुम्हीही भविष्यासाठी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक (Govt Saving Schemes) करण्यावर विश्वास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच चांगली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारकडून किसान विकास पत्र (KVP) यासह काही सरकारी योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. व्याज वाढल्यामुळे आता तुमची गुंतवणूक पूर्वीपेक्षा दुप्पट होऊ शकेल.

योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. सध्या किसान विकास पत्र (KVP) वर 7 टक्के व्याज दिले जात आहे. नवीन व्याजदर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आला आहे. गुंतवलेले पैसे 123 महिन्यांत (10.3 वर्षे) 7 टक्के व्याजदराने दुप्पट होतात. पूर्वी हे पैसे दुप्पट होण्यासाठी 124 महिने लागत होते.

दरम्यान, तुम्ही किसान विकास पत्र अंतर्गत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. तुम्हाला यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला ती 100 रुपयांच्या पटीत करावी लागेल. किसान विकास पत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन किसान विकास पत्र (KVP) खरेदी करू शकता. तुम्ही यामध्ये एकट्याने किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकता.

कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त किसान विकास पत्र घेऊ शकते. तुम्हाला पैशांची गरज भासल्यास ते तारण ठेवूनही तुम्ही कर्ज घेऊ शकता. एवढेच नाही तर तुम्ही ते तुमच्या पत्नी किंवा मुलाच्या नावावरही ट्रान्सफर करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही 123 महिन्यांनंतर कधीही तुमचे दुप्पट पैसे काढू शकता. जर तुम्ही हे पैसे जास्त काळासाठी ठेवले तर तुम्हाला तितकाच फायदा मिळू शकतो.

Web Title: kisan vikas patra invest in kvp and get double money in 123 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.