Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरकपातीची टांगती तलवार

नोकरकपातीची टांगती तलवार

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असतानाच २0१५-१६ या वर्षात वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात वृद्धीदर ३.७ टक्क्यांवर आला.

By admin | Published: February 28, 2017 04:11 AM2017-02-28T04:11:25+5:302017-02-28T04:11:25+5:30

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असतानाच २0१५-१६ या वर्षात वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात वृद्धीदर ३.७ टक्क्यांवर आला.

Knightly sword | नोकरकपातीची टांगती तलवार

नोकरकपातीची टांगती तलवार


नवी दिल्ली : मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असतानाच २0१५-१६ या वर्षात वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात वृद्धीदर ३.७ टक्क्यांवर आला. सात वर्षांत पहिल्यांदाच घट झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये कंपन्यांकडून नोकरकपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.12% वस्तू उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील
वाटा तब्बल १५ ते १६ टक्के आहे. देशातील एकूण रोजगारापैकी १२ टक्के रोजगार या क्षेत्रातून मिळतो. हे क्षेत्र धोक्यात आल्यामुळे नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गदा येऊ शकते. त्यामुळे सरकारने मदतीसाठी पावले उचलली पाहिजे, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
>काही धक्कादायक घटना
सप्टेंबर २0१६पर्यंतच्या सहा महिन्यांत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांनीही कमी प्रमाणात नोकरकपात केली आहे. नोव्हेंबर २0१४मध्ये म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक-इन-इंडिया मोहिमेची घोषणा केल्याच्या काहीच आठवड्यांनंतर नोकियाने चेन्नईमधील आपला कारखाना बंद केला. त्यामुळे ६,६00 पूर्ण वेळ कामगार बेरोजगार झाले.

Web Title: Knightly sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.