रिलायन्स जिओचे अनेक प्रीपेड प्लॅन्स (Reliance Jio Prepaid Plans) अन्य खासगी दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. परंतु सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांना काही चांगले प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. याच्या किंमती आणि त्यात मिळणारे फायदेही चांगले आहे. बीएसएनएलचे काही प्लॅन्स जिओच्या तुलनेत अतिशय चांगलेही आहे. पाहूया या प्लॅन्सबद्दल अधिक माहिती.
जिओचा 479 चा प्लॅन Jio चा 479 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएससह दररोज 1.5 GB डेटा मिळतो. या पॅकमध्ये ग्राहकांना एकूण 84GB डेटा मिळतो आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64Kbps इतका करण्यात येतो. याशिवाय या प्लॅन्समध्ये जिओ अॅप्सचंदेखील सबस्क्रिप्शन मिळतं.
बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅनजिओप्रमाणेच बीएसएनएसही एक प्लॅन ऑफर करत आहे. याची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये ग्राहकांना एकूण 180GB डेटा मिळतो. जिओच्या तुलनेत यामध्ये थोड्या जास्त किंमतीत अधिक वैधता आणि अतिरिक्त डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि दररोज 100 एसएमएस देण्यात येतात. बीएसएनएलच्या वेबसाईटवर वर हा प्लॅन "STV_499" असा लिस्ट करण्यात आला आहे.