Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय आहे गोल्ड ईटीएफ, का महिन्यात गुंतवणूकदारांनी काढले ४५७ कोटी?, जाणून घ्या प्रश्नांची उत्तरं

काय आहे गोल्ड ईटीएफ, का महिन्यात गुंतवणूकदारांनी काढले ४५७ कोटी?, जाणून घ्या प्रश्नांची उत्तरं

जुलैमध्ये सोन्यातील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन नरमला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडातून (ETF) गुंतवणूकदारांनी जुलै २०२२ मध्ये ४५७ कोटी रुपये काढले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:59 PM2022-08-10T12:59:32+5:302022-08-10T12:59:59+5:30

जुलैमध्ये सोन्यातील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन नरमला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडातून (ETF) गुंतवणूकदारांनी जुलै २०२२ मध्ये ४५७ कोटी रुपये काढले आहेत.

know about gold etf why investors withdrew rs 457 crore in a month here is the answer to all these questions gold price rupee weak share market investment | काय आहे गोल्ड ईटीएफ, का महिन्यात गुंतवणूकदारांनी काढले ४५७ कोटी?, जाणून घ्या प्रश्नांची उत्तरं

काय आहे गोल्ड ईटीएफ, का महिन्यात गुंतवणूकदारांनी काढले ४५७ कोटी?, जाणून घ्या प्रश्नांची उत्तरं

जुलैमध्ये सोन्यातील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन नरमला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडातून (ETF) गुंतवणूकदारांनी जुलै २०२२ मध्ये ४५७ कोटी रुपये काढले आहेत. म्युच्युअल फंड इंडस्ट्री असोसिएशनच्या अहवालानुसार सोन्यामध्ये गुंतवणूक नक्कीच कमी झाली आहे, पण खात्यांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये गोल्ड ईटीएफ फोलिओची संख्या ३७,५०० ने वाढून ४६.४३ लाखांवर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया काय आहे गोल्ड ईटीएफ आणि असे काय झाले की त्यातून ४५७ कोटी रुपये काढले गेले.

गोल्ड ईटीएफ काय आहे?
गोल्ड ईटीएफ हे सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय आहे आणि म्युच्युअल फंडाचा भाग आहेत. ते युनिटमध्ये विकत घेतले जाते. हे कधीही शेअर्सप्रमाणे खरेदी आणि विक्री करता येते. हे विकल्यानंतर सोने मिळत नाही, परंतु सोन्याच्या किंमतीइतके पैसे मिळतात. सोन्यात गुंतवणुकीसाठी हा स्वस्त पर्याय मानला जातो, कारण त्यातील एक युनिट सोन्याच्या किंमतीएवढे आहे. याशिवाय, हे चोरी होण्याची जोखीम किंवा ते विकण्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

का काढली रक्कम?

  1. वाढत्या व्याजदरामुळे याच्या किमती घसरल्याने गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून रक्कम काढण्यास सुरूवात केली आहे.
  2. शेअर्समधील तेजीचा फायदा घेण्यासाठी लोक गोल्ड ईटीएफमधूनही बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.
  3. रुपयाच्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरही झाला आहे.
  4. सोन्याच्या किमती कमी झाल्याने गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकदारांनीही यातून रक्कम काढण्यास सुरूवात केली आहे.


कोणत्या पर्यायाच किती गुंतवणूक?

  • गोल्ड ईटीएफ रु. २०,०३८ कोटी
  • ईएलएसएस रु १,४७,९१० कोटी
  • मल्टीकॅप फंड रु. ५९,३०३ कोटी
  • लार्ज कॅप फंड रु २,३१,८५१ कोटी
  • मिड कॅप फंड रु. १,६८,४२८ कोटी
  • स्मॉल कॅप फंड रु ११२,३३२ कोटी
  • फोकस फंड रु. ९९,९३३ कोटी

Web Title: know about gold etf why investors withdrew rs 457 crore in a month here is the answer to all these questions gold price rupee weak share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.