Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम

तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम

PPF खाते निष्क्रिय झाले असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. कसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:29 PM2023-03-22T15:29:12+5:302023-03-22T15:29:41+5:30

PPF खाते निष्क्रिय झाले असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते पुन्हा सुरू करू शकता. कसे? जाणून घ्या...

know about how to restart inactive ppf account check all process step by step | तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम

तुमचं PPF Account बंद झालंय? ‘या’ पद्धतीने पुन्हा करता येईल सुरू; जाणून घ्या, प्रोसेस व नियम

PPF Account: आताच्या घडीला गुंतवणुकीसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, यासह विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करून कोट्यवधींचा परतावा मिळवू शकतो. पोस्ट ऑफिस, एलआयसी, विविध सरकारी किंवा खासगी बँकेतील गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते. हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणुकीतील एक उत्तम पर्याय म्हणजे PPF. मात्र, काही कारणास्तव पीपीएफ खाते बंद झाले तर काय करावे, याबाबत माहिती देत आहोत.

महागाईच्या काळात पीपीएफ हा सुरक्षित आणि सोयीस्कर गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF खात्यात गुंतवणूक केली असेल आणि तुमचे खाते काही कारणास्तव बंद झाले असेल किंवा निष्क्रिय झाले असेल, तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमचे खाते पुन्हा सुरू करू शकता. कोणतीही व्यक्ती फक्त एकच PPF खाते उघडू शकते. पीपीएफमध्ये गुंतवणूक कर सवलतीच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे. यामध्ये गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळतो. याशिवाय मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजाचे उत्पन्नही करमुक्त आहे. 

PPF Account कधी बंद होऊ शकते?

पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला एका वर्षात किमान ५०० रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही किमान गुंतवणुकीची अट पूर्ण केली नाही तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रिय होईल. पीपीएफ खातेदाराने एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम टाकली नाही किंवा ती ठेवायला विसरला तर हे खाते बंद होते. PPF मध्ये 15 वर्षांनी मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतरच ग्राहकाला त्याची रक्कम व्याजासह मिळते. हे व्याज दरवर्षी शिल्लक रकमेत जोडले जाते. हे बंद पीपीएफ खात्यावरही लागू आहे. सरकार वेळोवेळी व्याजदर निश्चित करीत असते. 

PPF Account पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे?

मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी बंद केलेले पीपीएफ खाते कायमचे बंद केले जाऊ शकत नाही. एखाद्याला ते पुन्हा सुरू करायचे असेल, तर हे काम मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी कधीही केले जाऊ शकते. पीपीएफ पासबुकमध्ये मॅच्युरिटीची तारीख नमूद केलेली असते.

- बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला ते उघडलेले बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक लेखी अर्ज द्यावा लागेल. 

- मॅच्युरिटी कालावधीदरम्यान बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू केले जाऊ शकते.

- यासाठी ५०० रुपयांसोबत वार्षिक ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 

- हे शुल्क वार्षिक आधारावर आकारले जाईल. बंद खात्यातील शिल्लक रक्कम खाते पुन्हा सुरू केल्यानंतरही काढता येत नाही. खातेदाराला ती रक्कम मॅच्युरिटीच्या वेळीच मिळते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: know about how to restart inactive ppf account check all process step by step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.