Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात यशाच्या शिखरावर जाण्यासाठी...

शेअर बाजारात यशाच्या शिखरावर जाण्यासाठी...

दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात उत्तम संधी असलेल्या निवडक कंपन्यांविषयी माहिती...

By पुष्कर कुलकर्णी | Published: October 3, 2022 10:33 AM2022-10-03T10:33:45+5:302022-10-03T10:34:30+5:30

दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात उत्तम संधी असलेल्या निवडक कंपन्यांविषयी माहिती...

know about share market company starts from a alphabet and its key information | शेअर बाजारात यशाच्या शिखरावर जाण्यासाठी...

शेअर बाजारात यशाच्या शिखरावर जाण्यासाठी...

आजच्या या नवीन मालिकेत गुंतवणूकदारांचे स्वागत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या लिस्ट आहेत. त्यापैकी काही फंडामेंटल्स चांगल्या असलेल्या किंवा भविष्यात उत्तम संधी असलेल्या निवडक कंपन्यांविषयी माहिती या सदरांतून दिली जाईल. दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या पहिल्या भागात ‘A’ या अक्षराने सुरू होणाऱ्या कंपन्यांविषयी...

एशियन पेंट्स 

घराघरात भिंतीवरील रंग काम करायचे असेल तर पहिले नाव मनात येते ते एशियन पेंट्सचे. घरगुती आणि औद्योगिक रंगकामासाठी लागणारे सर्व प्रकारचे पेंट्स तयार करणारी भारतातील अग्रेसर कंपनी.

फेस व्हॅल्यू     : रुपये १/-
सध्याचा भाव     : ३,३७५
मार्केट कॅप     : ३.४० लाख कोटी रुपये 
बोनस शेअर्स     : २००४ पर्यंत ४ वेळा
शेअर स्प्लिट    : १ : १० या प्रमाणात जुलै २०१३ मध्ये
रिटर्न्स         : गेल्या १० वर्षांत दहापट परतावा 
भाव पातळी      : वार्षिक हाय ३,५९० आणि  लो २,५६०

भविष्यात संधी :  स्टॉक अजून स्प्लिट होऊ शकत नाही; परंतु बोनस शेअर्सची संधी असू शकते. तसेच कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर शेअरचा भाव उत्तम प्रकारे वाढू शकतो.

अतुल लिमिटेड  

केमिकल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी. लाईफ सायन्स केमिकल जी शेती, जनावरे खाद्ये, फ्लेवर फूड्स यात वापरली जातात, तसेच वाहन उद्योग, कॉस्मेटिक, टेक्स्टाईल आणि पेंट्समध्ये वापरली जाणारी केमिकल्सचे उत्पादन आणि पुरवठा ही कंपनी करते.

फेस व्हॅल्यू     : रुपये १०/-
सध्याचा भाव     : ८,९८३
मार्केट कॅप     : २६ हजार कोटी
बोनस शेअर्स     : १९९१ मध्ये १:४ या प्रमाणात
शेअर स्प्लिट    : अजून नाही
रिटर्न्स         : गेल्या १० वर्षांत २५ पट परतावा 
भाव पातळी      : वार्षिक हाय रु १०,९६९ o लो ७,७५०/

भविष्यात संधी : स्टॉक स्प्लिट, बोनस शेअर्सची संधी आहे.

अव्हेन्यू सुपर मार्ट्स

आपण डी मार्ट हे नाव ऐकले असेलच. किंबहुना यातून खरेदीसुद्धा करीत असाल. भारतात कन्झ्युमर गुड्स रिटेल आऊटलेट क्षेत्रात अग्रेसर आणि नामवंत कंपनी. दमदार भविष्य आणि गुंतवणुकीवर उत्तम रिटर्न्स मिळण्याची संधी या शेअरमध्ये आहे.

फेस व्हॅल्यू     : रुपये १०/-
सध्याचा भाव     : ४,३९०
मार्केट कॅप     : २.८० लाख कोटी रुपये 
बोनस शेअर्स     : अजून नाही
शेअर स्प्लिट    : अजून नाही
रिटर्न्स         : मार्च २०१७  चार पट परतावा 
भाव पातळी      : वार्षिक हाय ५,९०० व लो ३,१८६
भविष्यात संधी :  उत्तम फंडामेंटल्स असलेल्या या शेअरमध्ये भविष्यात स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची संधी आहे.

A गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे एसीसी । अबॉट इंडिया । अदानी इंटरप्राइजेस । अदानी ग्रीन एनर्जी । आदित्य बिर्ला कॅपिटल । अपोलो हॉस्पिटल्स । ऑरोबिंदो फार्मा । आदित्य बिर्ला फॅशन । अशोक लेल्यांड, आदी शेअर्सवर लक्ष ठेवावे. यातील गुंतवणूकसुद्धा उत्तम परतावा देण्याची क्षमता राखते.

टीप : हे सदर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून, कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: know about share market company starts from a alphabet and its key information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.