Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे?

२ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे?

Withdrawal of 2000 Rupee Note: तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 02:09 PM2023-05-29T14:09:48+5:302023-05-29T14:10:15+5:30

Withdrawal of 2000 Rupee Note: तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

know about what are new rules for exchanging or deposit 2000 rupees notes in sbi hdfc pnb and icici bank | २ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे?

२ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे?

Withdrawal of 2000 Rupee Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. २ हजारांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधकांकडून टीका केली जात असून, याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, काही बँकांनी २ हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

२०,००० रुपये किंवा जास्तीत जास्त दोन हजारांच्या १० नोटांची मर्यादा रिझर्व्ह बँकेने निश्चित केली आहे. एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार किंवा दोन हजारांच्या १० नोटा बदलू शकते. RBIच्या मार्गदर्शक सूचनांनंतर SBI, HDFC, ICICI आणि PNB सारख्या मोठ्या बँकांनीही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. देशातील या प्रमुख बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलणे किंवा जमा करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या...

SBI चे नियम काय सांगतात?

देशातील सर्वात मोठी बँक SBI कडून सांगण्यात आले की, कोणतीही व्यक्ती कोणताही फॉर्म किंवा स्लिप न भरता २०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते, यासाठी कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागणार नाही.

HDFC बँकेने काय मार्गदर्शन सूचना जारी केल्या?

HDFC बँकेने जारी केलेल्या नोटिशीनुसार, कोणतीही व्यक्ती ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही शाखेत २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकते. त्याचबरोबर २०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील.

PNB बँकेने काय सांगितले आहे?

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये समाविष्ट असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सांगितले आहे की, कोणतेही ओळखपत्र न मागता आणि बँकेत फॉर्म भरल्याशिवाय २००० रुपयांच्या नोटा २०,००० च्या मर्यादेपर्यंत बदलल्या जातील.

ICICI बँकेकडून काय सांगण्यात आले आहे?

ICICI बँकेकडून सांगण्यात आले की, ग्राहक बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा कॅश डिपॉझिट मशीनला भेट देऊन २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


 

Web Title: know about what are new rules for exchanging or deposit 2000 rupees notes in sbi hdfc pnb and icici bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.