Lokmat Money > बिझनेस न्यूज > जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

एकूण ३६ कंपन्या आहेत जिथे एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:12 PM2023-02-05T15:12:21+5:302023-02-05T15:13:12+5:30

एकूण ३६ कंपन्या आहेत जिथे एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे.

Know about Where did LIC invest public money | जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एलआयसी) आर्थिक संकटात सापडलेल्या अदानी समूहात केलेली गंतवणूक सध्या चर्चेत आहे. परंतु एलआयसीनेगुंतवणूक केलेली ही एकमेव कंपनी नव्हे. अशा एकूण ३६ कंपन्या आहेत जिथे एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे.

१० दिवसांत ३० हजार कोटी गमावले
- जेव्हा हिंडनबर्ग अहवाल आला, तेव्हा अदानीच्या चार कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक ५७,१६६ कोटी रुपयांची होती. 
- तेव्हा एलआयसीला ३३,००० कोटींचा 
नफा मिळत होता, तो आता ३,३०० कोटींवर आला आहे. 
- या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये एलआयसीने सुमारे ३०,००० कोटी रुपये अवघ्या १० दिवसांत गमावले आहे.

५८% शेअर्सचे मूल्य घटले
एलआयसीचे अदानी समूह आणि इतर कंपन्यांमध्ये घेतलेल्या शेअर्सचे मूल्य गेल्या सहा महिन्यांत ५८%पर्यंत घटले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे... 
फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स
पिरामल एंटरप्रायझेस 
अरबिंदो फार्मा, इंडस टॉवर्स
लॉरस लॅब्स, बॉम्बे डाईंग
जेट एअरवेज (इंडिया)
सनटेक रियल्टी 
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर 
जेपी इन्फ्राटेक
ओमॅक्स 
 

Web Title: Know about Where did LIC invest public money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.