Join us

जनतेचा पैसा एलआयसीने कुठे कुठे गुंतविला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 3:12 PM

एकूण ३६ कंपन्या आहेत जिथे एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे.

देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एलआयसी) आर्थिक संकटात सापडलेल्या अदानी समूहात केलेली गंतवणूक सध्या चर्चेत आहे. परंतु एलआयसीनेगुंतवणूक केलेली ही एकमेव कंपनी नव्हे. अशा एकूण ३६ कंपन्या आहेत जिथे एलआयसीने गुंतवणूक केलेली आहे.

१० दिवसांत ३० हजार कोटी गमावले- जेव्हा हिंडनबर्ग अहवाल आला, तेव्हा अदानीच्या चार कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक ५७,१६६ कोटी रुपयांची होती. - तेव्हा एलआयसीला ३३,००० कोटींचा नफा मिळत होता, तो आता ३,३०० कोटींवर आला आहे. - या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये एलआयसीने सुमारे ३०,००० कोटी रुपये अवघ्या १० दिवसांत गमावले आहे.

५८% शेअर्सचे मूल्य घटलेएलआयसीचे अदानी समूह आणि इतर कंपन्यांमध्ये घेतलेल्या शेअर्सचे मूल्य गेल्या सहा महिन्यांत ५८%पर्यंत घटले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे... फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्सपिरामल एंटरप्रायझेस अरबिंदो फार्मा, इंडस टॉवर्सलॉरस लॅब्स, बॉम्बे डाईंगजेट एअरवेज (इंडिया)सनटेक रियल्टी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर जेपी इन्फ्राटेकओमॅक्स  

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारगुंतवणूक