बिझनेस टायकून आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नेहमीच काही ना काही पोस्ट अथवा व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट एकतर प्रेरणादायी असतात अथवा गमतीशीरही असतात. आपल्या पेजवर फॉलोअर्सचे व्हिडिओ शेअर करायलाही ते विसरत नाही. आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी एक फोटो ट्विट केला आहे. यात एक गरीब पिता उन्हातच एक रिकामी हातगाडी ढकलताना दिसत आहे आणि त्यावर त्यांचा मुलगा शाळेच्या ड्रेसमध्ये अभ्यास करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून कुणीही भावूक होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी हा फोटो का निवडला, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल. एक आशेचा किरण पाहत, मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक गरीब पित्याने आपला संपूर्ण त्रास आणि अडचणी बाजूला सारल्या आहेत. हा पिता पायी चालत असून त्याने आपल्या मुलाला हातगाडीवर बसवले आहे, जेणेकरून त्याला त्याचा अभ्यास करता यावा.
इमोशनल फोटो शेअर कर केलं हृदयस्पर्षी ट्विट - आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणि हा माझा वर्षातल सर्वात आवडता फोटो. क्षमा करा, हा फोटो कुणी क्लिक केले मला माहित नाही. त्यामुळे फोटो ग्राफरला क्रेडिट देऊ शकत नाही. हा फोटो मला माझ्या इनबॉक्समध्ये दिसला. आशा, मेहनत आणि आशावाद, यावरच आपण जगत असतो. पुन्हा एकदा, नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.' हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच हजारो लोकांनी याला लाईक केले आहे.