Join us

संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 8:05 AM

संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक कंपनीने आपला IPO जाहीर केला आहे.

ठळक मुद्देया कंपनीने काही अत्यंत प्रतिष्ठित संरक्षण कार्यक्रमांसाठी योगदान दिलेयमहाराष्ट्रातील नेरूळ (नवी मुंबई) आणि अंबरनाथ (ठाणे) येथे कारखानेअनेक परदेशी कंपन्यांनाही सेवा पुरविली

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून येत आहे. देशातील दोन्ही शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर आहेत. याशिवाय शेअर बाजार IPO सादर करणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढतेय. याचा लाभ गुंतवणूकदारांना होत असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक कंपनीने आपला IPO जाहीर केला आहे. कंपनीकडून १७० कोटींचे शेअर खुल्या बाजारात विक्री केले जाणार आहेत. (know all details about paras defence and space technologies ipo to open for subscription)

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नोलॉजिज लिमिटेड ही कंपनी संरक्षण व अवकाश अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उत्पादने व उपाययोजनांचे डिझायनिंग, विकास, उत्पादन व चाचणी यात कार्यरत आहे. या ऑफरमध्ये १४०६ दशलक्षपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ताजा इश्यूअन्स समाविष्ट आहे. 

शेअरची किंमत किती?

या फ्रेश इश्यूमधून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर यंत्रे व उपकरणांची खरेदी, वाढत्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी, काही कर्जांच्या परतफेडीसाठी, प्रिपेमेंटसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येईल , असे कंपनीने माहिती पत्रकात म्हटले असून, कंपनीकडून १७० कोटींचे शेअर खुल्या बाजारात विक्री केले जाणार आहेत. समभाग विक्री मंगळवार २१ सप्टेंबर २०२१ रोजी खुली होणार असून २३ सप्टेंबर २०२१ रोजी बंद होईल. या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर १६५ ते १७५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. शरद विरजी शाह, मुंजाल शरद शाह (प्रवर्तक सेलिंग शेअरहोल्डर्स) आणि अमि मुंजाल शाह, शिल्पा अमित महाजन आणि अमित नवीन महाजन यांच्याकडून १७२४४९० पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.

महाराष्ट्रातील एक आघाडीची कंपनी

या कंपनीने काही अत्यंत प्रतिष्ठित संरक्षण कार्यक्रमांसाठी योगदान दिले आहे आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेशन्स अंतर्गत या कंपनीने डिफेन्स अॅप्लिकेशनसाठी अनेक प्रकारच्या हाय परफॉरमन्स कम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, त्याचप्रमाणे सीमारेषेवरील संरक्षणासाठी सबसिस्टिम्स, क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि नौदल अॅप्लिकेशन्सचा पुरठा केला आहे. आताच्या घडीला महाराष्ट्रातील नेरूळ (नवी मुंबई) आणि अंबरनाथ (ठाणे) येथे त्यांचे कारखाने आहेत.

दरम्यान, स्थानिक पातळीवर कंपनीच्या ग्राहकांमध्ये संरक्षण व अवकाश संशोधनात कार्यरत असलेल्या अनेक सरकारी संस्थांपासून ते भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) आणि हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे; आणि टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड आणि अल्फा डिझाइन टेक्नोलॉजिज लिमिटेड आणि अल्फा डिझाइन टेक्नोलॉजिज लिमिटेडसारख्या खासगी कंपन्यांना उत्पादने आणि उपाययोजना पुरविण्यात येतात. या कंपनीतर्फे अनेक परदेशी कंपन्यांनाही सेवा पुरविली आहे. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार