Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारीच! 'या' सरकारी कंपनीसोबत फक्त 4 तास काम करून कमवा तब्बल 70 हजार; जाणून घ्या नेमकं कसं? 

भारीच! 'या' सरकारी कंपनीसोबत फक्त 4 तास काम करून कमवा तब्बल 70 हजार; जाणून घ्या नेमकं कसं? 

जितके अधिक कार्य कराल तितके अधिक कमिशन आपल्याला प्राप्त होईल. म्हणजेच या व्यवसायातील कमाई अमर्याद आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:34 PM2021-03-08T16:34:21+5:302021-03-08T16:38:32+5:30

जितके अधिक कार्य कराल तितके अधिक कमिशन आपल्याला प्राप्त होईल. म्हणजेच या व्यवसायातील कमाई अमर्याद आहे.

know how to earn good monthly income from lic | भारीच! 'या' सरकारी कंपनीसोबत फक्त 4 तास काम करून कमवा तब्बल 70 हजार; जाणून घ्या नेमकं कसं? 

भारीच! 'या' सरकारी कंपनीसोबत फक्त 4 तास काम करून कमवा तब्बल 70 हजार; जाणून घ्या नेमकं कसं? 

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या LIC साठी सरकारने तिजोरी उघडली आहे. एलआयसीसाठी अधिकृत भांडवल 25000 कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. कंपनी पुढच्या वर्षी बाजारात आयपीओ आणण्याच्या विचारात आहे, ज्यासाठी हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. LIC चा IPO आल्यानंतर गुंतवणूकदारांना एलआयसीच्या आयपीओद्वारे पैसे कमाविण्याची संधी मिळणार आहे. मात्र जर तुम्हाला एलआयसी जॉईन करून पैसे कमवायचे असल्यास कंपनी त्यासाठी खास कमिशन देते. LIC मध्ये कसे पैसे कमावता येतात जाणून घ्या कसं...

एलआयसीकडे असलेल्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण जितके अधिक कार्य कराल तितके अधिक कमिशन आपल्याला प्राप्त होईल. म्हणजेच या व्यवसायातील कमाई अमर्याद आहे. एलआयसी पॉलिसीवरील कमिशन हे पॉलिसीनुसार ठरते.

70 ते 75 हजार रुपये कमावण्याची संधी

दिल्लीच्या गीता कंदारी अनेक वर्षांपासून एलआयसीशी जोडलेल्या आहेत. दिवसा फक्त 4 ते 5 तास काम करून त्या महिन्याला 70 ते 75 हजार रुपये कमावतात. गीता कंदारी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीबरोबर काम करून आपण आपले इच्छित उत्पन्न निश्चित करू शकता. त्याच वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, यासाठी आपण आपल्या स्वत: च्या कामाचे तास देखील ठरवू शकता. कंदारी यांनी आपण जितक्या मोठ्या एलआयसी पॉलिसी ग्राहकांना उघडून द्याल तितके जास्त आपले उत्पन्न वाढेल. काही काळानंतर आपल्याला सर्वात मोठं उत्पन्न हे जुन्या पॉलिसीमधून मिळते. नूतनीकरण पॉलिसीसह आपले उत्पन्न चांगले होते.

कंपनीच्या वेबसाईटनुसार, जर ग्राहक 20 वर्षांची पॉलिसी घेत आहेत आणि दरवर्षी 10,000 रुपये प्रीमियम भरत असल्यास 20 वर्षांनंतर एन्डॉवमेंट पॉलिसीमध्ये एजंटला 1.35 लाख आणि मनीबॅक पॉलिसीमध्ये 1.43 लाख रुपये मिळतात. एजंटला जितक्या अधिक पॉलिसी मिळतात, त्यानुसार त्याचे उत्पन्नही वाढते. एलआयसी पॉलिसीच्या हप्त्यापैकी 25% हप्त्यांचे पैसे कंपनी कमिशन स्वरूपात देते. हे केवळ पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यावर (पहिल्या वर्षाचे प्रीमियम) लागू होते, त्यानंतर कमिशन कमी होते. जेव्हा पॉलिसीधारक हप्ता सादर करेल तेव्हा एजंटला कमिशन मिळेल. एजंटला एकदाच पॉलिसी बनवावी लागते. त्याचे कमिशन प्रत्येक हप्त्यावर निश्चित असते.

अशा प्रकारे कमिशन केलं जातं निश्चित

एलआयसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एन्डॉवमेंट आणि मनीबॅक पॉलिसीअंतर्गत वेगवेगळे कमिशन आहेत. दोन्ही पॉलिसींमध्ये कमिशनचे दर वेगवेगळे आहेत. एन्डॉवमेंट पॉलिसी एकूण हप्त्याच्या 35 टक्के आणि मनीबॅकमधील एकूण हप्त्याच्या 25 टक्क्यांपर्यंत कमिशन प्रदान करते. यानंतर कमिशन कमी होऊ लागते. एलआयसी पॉलिसीनुसार एजंट कमिशन ठरविला जातो. एन्डॉवमेंट पॉलिसीवर, एजंटला पहिल्या कमिशनच्या हप्त्याच्या 25 टक्के रक्कम मिळते. या व्यतिरिक्त 40% कमिशन अतिरिक्त एजंटला देण्यात येते, जर एखाद्या एजंटने ग्राहकाच्या पहिल्या दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला असेल तर एजंटला कमिशन म्हणून 2500 रुपये मिळेल. याशिवाय 1000 रुपये कमिशनचा 40 टक्के हिस्सा आहे. अशा प्रकारे एजंटला पहिल्या हप्त्यावर सुमारे 3500 रुपयांचे कमिशन मिळेल. पॉलिसी जितकी जास्त असेल तितक्या एजंटची कमाई जास्त होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: know how to earn good monthly income from lic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.