Gold Price Today: आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 146 रुपयांनी वाढून 47,997 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. यापूर्वी कामकाजाच्या दिवशी सोन्याचा भाव 47,851 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तसेच चांदीचा भावही 635 रुपयांनी वाढून 61,391 रुपये किलो झाला आहे. यापूर्वी कामकाजाच्या दिवशी चांदीचा भाव 60,756 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,812 डॉलर प्रति औंस आणि चांदी 22.75 डॉलर प्रति औंसवर होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी कॉमेक्समध्ये स्पॉट सोन्याची किंमत 1,812 डॉलर्स प्रति औंस होती. अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ झाली असली तरी, डॉलरचं मूल्य कमी झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
सोमवारी सोन्याचा भाव 136 रुपयांनी वाढून 48,060 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, एप्रिल डिलिव्हरीसाठीचे कॉन्ट्रॅक्ट्स 136 रुपये किंवा 0.28 टक्क्यांनी वाढून 48,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. हे 11,431 लॉटच्या बिझनेस टर्नओव्हरसाठी आहे. दुसरीकडे, फ्युचर्स ट्रेडमध्ये चांदीचा भाव 672 रुपयांनी वाढून 61,521 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 672 रुपये किंवा 1.1 टक्क्यांनी वाढून 61,521 रुपये प्रति किलो झाला. ही किमती 14,148 लॉटच्या बिझनेस टर्नओव्हरसाठी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याचा भाव 48,082 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 61,331 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.