Aadhaar Card Update : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे या कामांसाठी आधारकार्ड मागितलं जातं. आधारमध्ये नावाचं स्पेलिंग, मोबाईल नंबर किंवा पत्ता चुकीचा असल्यास तुम्हाला या योजनांमधून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. पीएम किसान योजनेचा हप्ता थांबला तर ई श्रमचे पैसे अडकले जातात.
अशा परिस्थितीत आधार अपडेट करण्यासाठी लोक मग आधार केंद्रांकडे धावतात. काही ठिकाणी लोक हे काम करण्यासाठी मनाप्रमाणे पैसे घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. अशातच आधारनं यासाठी किती शुल्क निश्चित केलंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर जाणून घेऊया काय सांगितलंय UIDAI नं.
#Aadhaar नामांकन निःशुल्क है।
— Aadhaar (@UIDAI) May 18, 2022
आधार में कोई डेमोग्राफिक अपडेट के लिए ₹ 50 और बायोमेट्रिक अपडेट के लिए ₹ 100 का भुगतान करना होगा।
यदि आपसे अतिरिक्त शुल्क लिया जाता है, अधिक जानकारी के लिए हमारे टोल फ्री नंबर 1947 या help@uidai.gov.in पर ई-मेल करें।@PIB_India@mygovindiapic.twitter.com/LOBHx09QVd
UIDAI यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. आधारमध्ये काही डेमोग्राफीक बदल करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. तर बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारलं जातं. जर तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारलं गेलं तर तुम्ही आमच्या 1947 किंवा help@uidai.gov.in यावर इमेल करू शकता असं आधारनं म्हटलं आहे. आधार एनरॉलमेंट पूर्णपणे मोफत आहे. तर मुलांसाठी आवश्यक बायोमेट्रिकही मोफत आहे. जिकडे डेमोग्राफिकची गोष्ट येते, तर तुमचं नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल अपडेट केवळ ५० रुपये देऊन करू शकता.