Aadhaar Card Update : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे. तुमच्याकडे या कामांसाठी आधारकार्ड मागितलं जातं. आधारमध्ये नावाचं स्पेलिंग, मोबाईल नंबर किंवा पत्ता चुकीचा असल्यास तुम्हाला या योजनांमधून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. पीएम किसान योजनेचा हप्ता थांबला तर ई श्रमचे पैसे अडकले जातात.
अशा परिस्थितीत आधार अपडेट करण्यासाठी लोक मग आधार केंद्रांकडे धावतात. काही ठिकाणी लोक हे काम करण्यासाठी मनाप्रमाणे पैसे घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. अशातच आधारनं यासाठी किती शुल्क निश्चित केलंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर जाणून घेऊया काय सांगितलंय UIDAI नं.