Join us

माहितीये काेणाला मिळाला २ हजार काेटी रुपये वार्षिक पगार, काेणत्या सीईओंचं वेतन जगात सर्वाधिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:57 AM

जगातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंना भरघाेस पगार दिला जाताे.

वाॅशिंग्टन : जगातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंना भरघाेस पगार दिला जाताे. सर्वाधिक पगार काेणत्या कंपनीच्या सीईओंना मिळताे? तर ब्लॅकस्टाेन इन्क. चे स्टीफन श्वार्झमन यांना सर्वाधिक पगार मिळताे.  

ॲपल आणि गुगलच्या टीम कुक आणि सुंदर पिचाई यांच्यापेक्षाही जास्त पगार श्वार्झमन घेतात. ‘ब्लॅकस्टाेन’ ही एक वित्तीय व्यवस्थापन संस्था आहे. २५३ दशलक्ष डाॅलर म्हणजे सुमारे २ हजार काेटी रुपये एवढे वार्षिक वेतन स्टीफन श्वार्झन यांनी २०२२मध्ये घेतले. 

कोणाचा किती पगार? 

  • २५३ दशलक्ष डाॅलर्स - स्टीफन श्वार्झमन, ब्लॅकस्टाेन
  • २२६ दशलक्ष डाॅलर्स - सुंदर पिचाई, गुगल
  • १८२ दशलक्ष डाॅलर्स -स्टीफन शेर, हर्ट्झ
  • १६८ दशलक्ष डाॅलर्स - बॅरी मॅकार्थी, पेलाेटाॅन
  • १३९ दशलक्ष डाॅलर्स - एम. रॅपिनाे, लाईव्ह नेशन
  • १३८ दशलक्ष डाॅलर्स - सॅफ्रा कॅट्झ, ओरॅकल

 

टॅग्स :गुगलसुंदर पिचईनोकरी