Join us

इन्शूरन्स हा खर्च नाही, तुमचं कुटुंब आणि तुमची सुरक्षा आहे; हे ५ विमा नक्की खरेदी केले पाहिजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:37 PM

विमा ही आजच्या काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळात लोकांना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे विम्याला विनाकारण होणारा खर्च मानतात

विमा ही आजच्या काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळात लोकांना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे विम्याला विनाकारण होणारा खर्च मानतात. पण विमा हा खर्च नाही, तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाचं एक साधन आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला खूप दिलासा मिळू शकतो. आम्ही तुम्हाला त्या ५ विम्यांबद्दल सांगत आहोत जे आजच्या काळात प्रत्येकानं खरेदी करणं आवश्यक आहे.

टर्म इन्शूरन्स - हा घरच्या प्रमुखासाठी खूप महत्त्वाचा असतो. टर्म इन्शूरन्स ही एक प्रकारचा जीवन विमा पॉलिसी आहे जी ठराविक दरानं मर्यादित कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. अशा परिस्थितीत, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कव्हरची रक्कम नॉमिनीला एकरकमी दिली जाते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. लाइफ इन्शूरन्स सारख्या टर्म इन्शूरन्समध्ये मॅच्युरिटी रिटर्न मिळत नाहीत.

हेल्थ इन्शूरन्स - आरोग्य विमा ही आजच्या काळात प्रत्येकाची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य विमा असणं आवश्यक आहे. चांगल्या आरोग्य विमा योजनेत डॉक्टरांची फी, हॉस्पिटलायझेशन खर्च, वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो.

मोटर इन्शूरन्स - तुमच्याकडे कार, बाईक किंवा इतर कोणतंही वाहन असल्यास, तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्ससह कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर विमा कव्हर घेणं आवश्यक आहे. या विम्याचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागतं.

अॅक्सिडेंट इन्शूरन्स - वेळ सांगून येत नाही असं म्हणतात. जर जाता येता अपघात धाला, तर अशासाठी सरकारकडून Pradhan Mantri Suraksha Bima Yojana चालवली जाते. यामध्ये २ लाख रुपयांपर्यंतचं कव्हरेज मिळतं. याचा वार्षिक प्रीमिअम २० रुपये आहे. याशिवाय तुम्ही स्वतंत्रपणे अपघात विमा पॉलिसी देखील खरेदी करू शकता.

होम इन्शूरन्स - होम इन्शूरन्स हे तुमच्या घरासाठीचं विमा संरक्षण आहे. बरेच लोक याला वायफळ खर्च मानतात. परंतु कठीण काळात ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. यामध्ये तुमच्या घराचं तसेच घरातील वस्तूंचं झालेलं नुकसानही कव्हर केलं जातं. हे बिल्डिंग स्ट्रक्चरचे विविध धोके आणि जोखीमीपासून संरक्षण करते. यामध्ये तुमच्या वैयक्तिक मालमत्तेचे म्हणजेच इलेक्ट्रिक उपकरणं, कम्प्युटर, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर, फर्निचर यांचा समावेश असतो. याशिवाय दागिन्यांच्याही नुकसान भरपाईचा समावेश आहे. आजकाल नैसर्गिक आपत्तींसारख्या घटनाही वाढल्या आहेत. चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत, या विम्याच्या माध्यमातून, आपण आग, चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करू शकता.

टॅग्स :पैसाव्यवसाय