Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:15 AM2024-02-07T05:15:51+5:302024-02-07T05:16:46+5:30

कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला.

Kochhar's arrest is illegal, bail is upheld by the court | कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

कोचर यांची अटक अवैध, कोर्टाकडून जामीन कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना केलेली अटक बेकायदा असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्या. अनुजा प्रभुदेसाई व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने सीबीआयला झटका देत कोचर दाम्पत्याचा मंजूर केलेला अंतरिम जामीन मंगळवारी कायम केला.

चंदा आणि दीपक कोचर यांना २४ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटींच्या कर्जामध्ये फसवणूक आणि अनियमितता केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. कोचर बँकेचा कारभार सांभाळत असताना व्हिडिओकाॅन समूहाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामोबदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्युअबलमध्ये व्हिडिओकॉनने आर्थिक गुंतवणूक केली. त्यानंतर व्हिडिओकाॅनला दिलेले कर्जाचे एनपीएमध्ये रूपांतर झाले आणि बॅँकेची फसवणूक झाली. अटक केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने चंदा व दीपक कोचर यांना २९ डिसेंबर २०२२ पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. गेल्यावर्षी ९ जानेवारी रोजी न्यायालयाने दोघांचाही अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला.

Web Title: Kochhar's arrest is illegal, bail is upheld by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.