कोकण रेल्वेचा दुहेरीकरणाचा प्रस्ताव मंजूर?
By admin | Published: July 11, 2015 12:15 AM
रेल्वे बोर्ड : कोलाड ते ठोकूर मार्गाचा प्रस्ताव
रेल्वे बोर्ड : कोलाड ते ठोकूर मार्गाचा प्रस्तावमुंंबई : कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकण रेल्वे एकेरी मार्ग असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे दुहेरी मार्ग असावा याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) सिद्धेश्वर तेलगु यांना विचारले असता, दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप या मंजुरीची प्रत रेल्वे मंत्रालयाकडून कोकण रेल्वे प्रशासनाला मिळालेली नाही.