Join us

Konstelec Engineers IPO Listing: पहिल्याच दिवशी धमाकेदार लिस्टिंग, तिप्पट झाला गुंतवणूकदारांचा पैसा; ISRO-NTPC-TATA आहेत क्लायंट्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:58 AM

गुंतवणूकदारांना 70 रुपये किमतीत शेअर्स जारी करण्यात आले होते. आज ते एनएसई एसएमईवर 210 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाले.

Konstelec Engineers IPO Listing: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कॉन्स्टेलेक इंजिनियर्सच्या (Konstelec Engineers) शेअर्सची आज NSE SME वर तुफान एन्ट्री झाली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या आधारावर कंपनीचा आयपीओ (IPO) 341 पटींपेक्षा जास्त सबस्क्राइब झाला.

आयपीओ अंतर्गत, गुंतवणूकदारांना 70 रुपये किमतीत शेअर्स जारी करण्यात आले होते. आज ते एनएसई एसएमईवर 210 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाले. याचा अर्थ आयपीओतील गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांचा (Konstelec Engineers Listing Gain) लिस्टिंग गेन झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनं आणखी उसळी घेतली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 220.50 रुपयांच्या अपर सर्किटवर पोहोचले, याचा अर्थ आयपीओतील गुंतवणूकदारांना 215 टक्के नफा झाला.

मिळालेला जबरदस्त प्रतिसाद

कोंस्टेलेक इंजिनिअर्सचा 28.70 कोटी रुपयांचा आयपीओ 19-24 जानेवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या आधारावर, या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि तो एकूण 341.80 पट सबस्क्राईब झाला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी राखीव असलेला हिस्सा 113.80 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा 421.36 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा 437.67 पट सबस्क्राईब झाला होता. या आयपीओ अंतर्गत, 10 चे फेस व्हॅल्यू असलेले 2.24 कोटी रुपये किमतीचे 41 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या शेअर्सद्वारे उभारण्यात आलेला पैसा खेळत्या भांडवलाच्या गरजा, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे आणि इश्यू संबंधित खर्चांसाठी वापरला जाईल.

कंपनीबाबत माहिती

डिसेंबर 1995 मध्ये सुरू झालेल्या कॉन्स्टेलॅक इंजिनिअर्स इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन, सोलर प्लांट इंस्टॉलेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऑटोमेशनशी संबंधित सेवा प्रदान करते. कंपनीनं 400 कोटींहून अधिक किमतीच्या 45 मेगा प्रकल्पांसह 200 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. जेएसडब्ल्यू स्टील, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम इस्रो, एसीसी, बार्क, अदानी, एनटीपीसी, टाटा स्टील इ. यांचे ग्राहक आहेत. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती सातत्यानं मजबूत होत आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग