Join us  

कोटक महिंद्रा बँकेकडून २०वी ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ व्‍हॅन लॉन्‍च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 2:02 PM

डिसेंबर २०२१ ला पुण्‍यातून सुरूवात, आता देशभरातील २० शहरांमध्‍ये कार्यरत

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (‘केएमबीएल’/कोटक) ने बेंगळुरूमध्‍ये मोबाइल आधार सेवा केंद्र ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ व्‍हॅन लॉन्‍च केली आहे. ही व्‍हॅन नागरिकांसह ज्‍येष्‍ठ नागरिक, विकलांग व्‍यक्‍ती व गरोदर महिलांना सोईस्‍कर आधार सेवा देईल. ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ शहरामध्‍ये राहणाऱ्या नागरिकांना घरपोच आधारसाठी नोंदणी आणि आधार माहितीचे अपडेशन यांसारख्‍या  समकालीन आधार सेवा केंद्राकडून दिल्‍या जाणाऱ्या सर्व प्रमुख सेवा देईल. बँकेने या उपक्रमासाठी यूआयडीएआय (युनिक आयडेण्टिफिकेशन ऑथोरिअी ऑफ इंडिया) सोबत सहयोग केला आहे. या व्‍हॅन्‍समध्ये आधार ऑपरेटरसोबत बँकेचा कर्मचारी असतो. शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या एका कार्यक्रमामध्‍ये यूआयडीएआय आरओ – बेंगळुरूचे उपमहासंचालक श्री. अनुप कुमार आणि कोटक महिंद्रा बँक लि.चे संयुक्‍त अध्‍यक्ष श्री. हेमल वकिल यांनी ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ व्‍हॅनला झेंडा दाखवला.

ही वॅन शहराच्‍या कक्षेत कार्यरत असेल आणि निवासी सोसायटी, शैक्षणिक संस्‍था, हॉस्पिटल्‍स, सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये इत्‍यादी सारख्या विवि‍ध ठिकाणच्‍या निवासींच्‍या व्‍यापक नेटवर्कला सेवा देईल. ही सेवा निवडक सु्ट्ट्यांच्‍या दिवशी देखील उपलब्‍ध असेल. ही व्‍हॅन डिसेंबर २०२१ मध्‍ये पुण्‍यात सुरू करण्‍यात आली. मिळालेल्‍या सकारात्‍मक प्रतिसादामधून उत्‍साहित होत पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये बँकेने देशभरातील २० शहरांमध्‍ये ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ लॉन्‍च केले. तसेच पुढील काही महिन्‍यांमध्‍ये आणखी १० शहरांमध्‍ये ही व्‍हॅन लॉन्‍च करण्‍याची योजना आहे. तसेच देशभरातील कोटक महिंद्रा बँकेच्‍या १२० बँक शाखांमध्‍ये आधार नोंदणी व अपडेशन संबंधित सेवांचा देखील लाभ घेता येऊ शकतो.

कोटक महिंद्रा बँकेची ‘आधार ऑन व्हील्‍स’ कार्यरत असलेल्‍या शहरांची यादी:

  1. मुंबई
  2. पुणे
  3. दिल्‍ली
  4. नागपूर
  5. चेन्‍नई
  6. ठाणे
  7. कोलकाता
  8. नाशिक
  9. हैदराबाद
  10. कानपूर
  11. अहमदाबाद
  12. सुरत
  13. इंदौर
  14. जयपूर
  15. लखनौ
  16. नोएडा
  17. विशाखापटणम
  18. गुरगाव
  19. वडोदरा
  20. बेंगळुरू

 

"आम्‍हाला बेंगळुरूमधील नागरिकांसाठी आमची २०वी ‘आधार ऑन व्‍हील्‍स’ व्‍हॅन सेवा लॉन्‍च करण्‍याचा आनंद होत आहे,’’ असे कोटक महिंद्रा बँक लि.चे संयुक्‍त अध्‍यक्ष श्री. हेमल वकिल म्‍हणाले. ‘‘आम्‍ही यूआयडीएआयचे त्‍यांच्‍या पाठिंब्‍यासाठी आभार मानतो. सरकारी, तसेच गैर-सरकारी सेवा उपलब्‍ध होण्‍यास आवश्‍यक असलेले आधार डिजिटल पोकळी भरून काढण्‍यासोबत पारदर्शकता व अनुकूलतेची खात्री मिळण्‍यामध्‍ये देखील मदत करते. हा निश्चितच जगातील सर्वात यशस्‍वी बायोमेट्रिक प्रोग्राम्‍सपैकी एक आहे," असे त्यांनी सांगितले.

"यूआयडीएआय प्रादेशिक कार्यालय बेंगळुरूला बेंगळुरूमधील नागरिकांसाठी आधार ऑन व्‍हील्‍स लॉन्‍च करण्‍यामध्‍ये कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे,’’ असे यूआयडीएआय आरओ – बेंगळुरूचे उपमहासंचालक श्री. अनुप कुमार म्‍हणाले. ‘‘यामुळे शहरातील रहिवाशांना, विशेषत: ज्‍येष्‍ठ नागरिक, विकलांग व्‍यक्ती इत्‍यादींना दीर्घकाळापर्यंत सेवा देता येईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना ५ वर्षे आणि १५ वर्षे वयोगटातील अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट, तसेच आधारची १० वर्षे पूर्ण केल्यानंतर दस्तऐवज अपडेट करण्यास मदत होईल," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :बँक