Join us  

कोटक मंहिंद्रा बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ‘कोटक फिन’ची सुरुवात, पाहा काय आहेत फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 7:19 PM

कोटक महिंद्रा बंकेनं ‘कोटक फिन’ या सेवेची सुरुवात केली आहे.

कोटक महिंद्रा बंकेनं ‘कोटक फिन’ या सेवेची सुरुवात केली आहे. कोटक फिन हे विशेषत: व्यवसाय बँकिंग आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी डिझाइन केलेले संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे कोटक बँकेच्या ग्राहकांना सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग तसेच व्यापार आणि सेवा, खाते सेवा, पेमेंट आणि कलेक्शनच्या बाबतीत मूल्यवर्धित सेवा प्रदान केल्या जातील.

कोटक फिनचे सिंगल प्लॅटफॉर्म ग्राहकांसमोरील अडचणी आणि आव्हाने कमी करण्यास मदत करते. याद्वारे निरनिराळे लॉग इन आणि निरनिराळ्या युझर इंटरफेसची गरज संपवून ग्राहकांसाठी सर्व ट्रेड आणि सेवा सहजरित्या आणि सोयीस्कर बनण्यास मदत मिळते. 

कोटक फिन सेल्फसर्व्हिसेसला सक्षम बनवतं आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवतं. डेटा व्यक्तिमत्व-आधारित डॅशबोर्डद्वारे माहिती भरपूर विजेट्सद्वारे सादर केली जाते. याद्वारे युझर्सना आपला अनुभव एका विशिष्ट प्रकारे तयार करण्याची क्षमता मिळते.

‘‘आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये आम्‍ही सातत्यानं जलद आणि एकत्रित बँकिंग सेवेचा शोध घेत आहे हे आम्ही ओळखलंय. उच्‍च दर्जाचा बँकिंग अनुभव देण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्‍नामध्‍ये आम्‍ही आता डिजिटल व्‍यासपीठ ‘कोटक फिन’ सादर करत आहोत, जे तुमच्‍या सर्व व्‍यवसाय-‍बँकिंग गरजांची काळजी घेईल. डिजिटल हा पुढे जाण्‍याचा मार्ग आहे याचा आम्हाला विश्वास आहे आणि फिनसह आम्‍हाला देशभरात डिजिटायझेशन लाटेचा अवलंब करण्‍यासोबत प्रचार करण्‍याचा अभिमान वाटतो,’’ अशी प्रतिक्रिया कोटक महिंद्रा बँकेचे पूर्ण-वेळ संचालक केव्‍हीएस मनियन यांनी दिली.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र