KPI Green Energy Ltd Order : ग्रीन एनर्जी कंपनी केपीआयला ड्रॉप एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून नवीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या वीज प्रकल्पासाठी कंपनीला लेटर ऑफ इंटेंट प्राप्त झाले आहे. दरम्यान, सोमवारी केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. उद्या या शेअरमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. गुजरातमधील KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड (पूर्वी KPI ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाने ओळखली जाणारी) ही एक आघाडीची अक्षय ऊर्जा निर्मिती कंपनी आहे.
13.30 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डरमिळालेल्या माहितीनुसार, KPI ग्रीन एनर्जीला 13.30 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प 'कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर' मॉडेल अंतर्गत असेल. सुमिकोट लिमिटेड, एकता प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेड, राधिका फॅब्रिक्स आणि संजोपिन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी हे ऑर्डर दिले आहेत. 2025 मध्ये वेगवेगळ्या टप्प्यात हे प्रकल्प पूर्ण केले जातील.
पहिल्या तिमाहीत 66.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफाKPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 66.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा 33.26 कोटी रुपये होता. याशिवाय, कंपनीचा एकूण महसूल वार्षिक आधारावर 190.56 कोटी रुपयांवरून 349.85 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. KPI ग्रीन एनर्जीने 5 रुपये दर्शनी मूल्यावर प्रति इक्विटी शेअर 0.20 पैसे अंतरिम लाभांश देखील घोषित केला होता, ज्याची रेकॉर्ड तारीख 21 ऑगस्ट 2024 होती.
कंपनीचे शेअर्स घसरणीसह बंदसोमवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान KPI ग्रीन एनर्जीचे शेअर्स BSE वर 2.05% किंवा 19 अंकांनी घसरून 907.95 रुपयांवर बंद झाले. BSE ने कंपनीचे शेअर्स ASM LT: स्टेज 4 मध्ये ठेवले आहेत. KPI ग्रीन एनर्जीचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 1,116 आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक रु. 255.33 आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या सहा महिन्यांत 2.44 टक्के तर गेल्या वर्षभरात 188.45 टक्के परतावा दिला आहे.