Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

IPO: आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णालयांची साखळी असलेली एक कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 05:22 PM2021-06-13T17:22:13+5:302021-06-13T17:24:24+5:30

IPO: आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णालयांची साखळी असलेली एक कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

krishna institute of medical sciences to open ipo on rs 2144 crore on june 16 | आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

आरोग्य क्षेत्रात गुंतवणुकीची संधी; ‘या’ हॉस्पिटलचा येतोय IPO; दोनच दिवस राहणार खुला!

नवी दिल्ली: आताच्या घडीला शेअर बाजार नवीन उच्चांकांवर असून, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या IPO च्या माध्यमातून निधी उभारताना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरात आरोग्य क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी करत शेअर बाजारात नवनवे उच्चांक स्थापित केल्याचे दिसून येत आहे. यातच आता आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णालयांची साखळी असलेली एक कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत असून, विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांसाठी शेअर खुला राहणार असल्याची माहिती मिळत आहे. (krishna institute of medical sciences to open ipo on rs 2144 crore on june 16)

आंध्र प्रदेशमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील हॉस्पिटल साखळी असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेडकडून भांडवली बाजारातून निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कंपनीचा आयपीओ १६ जून २०२१ रोजी खुला होणार असून, १८ जून २०२१ रोजी बंद होईल. 

PayTM देतेय FD वर दमदार व्याज; केवळ १०० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

एका शेअरचा भाव किती?

 या योजनेसाठी प्रती इक्विटी शेअर ८१५ ते ८२५ रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओमध्ये २१४४ कोटींचे इक्विटी शेअर्स विक्री केले जाणार आहेत. तसेच या ऑफरमध्ये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांद्वारे सबस्क्रिप्शनसाठी २०० दशलक्ष एकत्रित मूल्याचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले असून, या प्रस्तावामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ऑफर प्राइसवर ४० रुपये सवलत देण्यात आली आहे.

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

बीएसई आणि एनएसईमध्ये होणार नोंदणी

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंच ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या दोन्ही भांडवली बाजारात शेअरची नोंदणी होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या योजनेत गुंवणूकादारांना किमान १८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १८च्या पटीतील इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. सेबीच्या नियमानुसार नेट ऑफरचा किमान ७५ टक्के भाग क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सना वितरित केला जाणार आहे. तर एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. यासाठी अँकर इन्व्हेस्टर्सना ज्या किंमतीला वितरण केले गेले, तेवढ्या किंमतीच्या किंवा त्याहून अधिक वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून येणे आवश्यक आहे. 
 

Web Title: krishna institute of medical sciences to open ipo on rs 2144 crore on june 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.