एप्रिलमध्ये मुंबईत मोठी डील झाली आहे. एवढी मोठी की त्या पैशांत मुंबईत २०० च्या वर फ्लॅट घेता येतील. डोळे विस्फारले ना, बिर्ला ग्रुपच्या कुमार मंगलम बिर्ला यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. बिर्लांचा काही वर्षांपूर्वी यापेक्षा डबल किंमत मोजून घेतलेला एक बंगला आहेच, परंतू त्यांनी कारमाइल रोडवरील अब्जाधीशांच्या गल्लीतील एक मोठा बंगला घेतला आहे.
बीजेएच प्रॉपर्टीने मुंबईच्या प़ॉश भागात एक जुना बंगला खरेदी केला आहे. एमएल डहाणूकर मार्गावर हा ग्राऊंड प्लस टू वाला बंगला आहे. माध्यमांतील बातम्यांनुसार १० एप्रिलला ही डील पुर्ण झाली आहे. आदित्य बिर्ला सुमहाने या संपत्तीसाठी नोंदणी केली आहे. हा बंगला 18,494.05 चौ.मी एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेला आहे. यासाठी त्यांनी 13.20 कोटी रुपयांची स्टँप ड्युटी भरली आहे. एर्नी खरशेदजी दुबाश यांच्याकडून बिर्लांनी संपत्ती घेतली आहे.
बिर्लांनी यापूर्वीही २०१५ मध्ये मलबार हिल रोडला 425 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. या बंगल्यात २० हून अधिक खोल्या आहेत. या बंगल्यात बिर्ला कुटुंबीय राहतात.
कोण आहेत कुमार मंगलम बिर्ला...
कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म 14 जून 1967 रोजी मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आदित्य विक्रम बिर्ला हे प्रसिद्ध उद्योगपती होते. बीकॉम आणि एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर कुमार यांनी वयाच्या २८ व्या वर्षी बिर्ला ग्रुपची जबाबदारी स्वीकारली. 1995 मध्ये वडिलांच्या अकाली निधनानंतर कंपनीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन झाल्यानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"