Lokmat Money > बिझनेस न्यूज > कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

kumar mangalam birla : व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:21 PM2021-08-04T22:21:54+5:302021-08-04T22:41:53+5:30

kumar mangalam birla : व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले आहे.

kumar mangalam birla steps down as non executive chairman of vodafone idea | कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

मुंबई : आदित्य बिर्ला समूहाचे (Aditya Birla Group) अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाचे (Vodafone Idea) बिगर-कार्यकारी संचालक आणि बिगर-कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने बुधवारी ही माहिती दिली.  व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने सांगितले की, आदित्य बिर्ला समूहाकडून हिमांशु कपाडिया यांची बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  व्होडाफोन-आयडिया सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहे, अशा वेळी हे बदल झाले आहेत. (kumar mangalam birla steps down as non executive chairman of vodafone idea)

व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले आहे. दरम्यान, कंपनीवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी कुमार मंगलम बिर्ला यांनी स्वतःची २७ टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी हिस्सा विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र तूर्त केंद्र सरकारने या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कुमार मंगलम बिर्ला यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते.

गेल्या ७ जुलैला कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना एक पत्र पाठविले आहे. प्राप्त माहितीनुसार, व्हीआयएलवर १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून त्यात स्पेक्ट्रमची थकीत रक्कम तसेच समायोजित सकळ महसुलाची देयता यांचा समावेश आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये २५ हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली होती. तथापि, कोणीही गुंतवणूकदार समोर न आल्यामुळे ती बारगळली. त्यामुळे कुमार मंगलम बिर्ला यांनी सरकारला साकडे घातले होते.

दरम्यान, व्होडाफोन-आयडियाचे बाजार भांडवल जवळपास २४००० कोटी आहे. गेल्या काही वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात सेवा देणे कंपनीसाठी अवघड बनले आहे. याच स्पर्धेमुळे व्होडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या होत्या. मात्र तरीही सातत्याने होणारा तोटा आणि एजीआर शुल्काचा वाढता डोंगर, यामुळे व्होडाफोन-आयडियाची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या घोषणेचे शेअर बाजारामध्ये नकारात्मक परिणाम उमटले. 

Web Title: kumar mangalam birla steps down as non executive chairman of vodafone idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.