Lokmat Money > बिझनेस न्यूज > कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा

कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. ‘फास्टॅग’द्वारे महामार्गावर सुलभतेने टोल भरणा केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:36 AM2024-02-07T05:36:14+5:302024-02-07T05:36:51+5:30

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. ‘फास्टॅग’द्वारे महामार्गावर सुलभतेने टोल भरणा केला जातो.

KYC the FASTag of the car before 29 February | कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा

कारच्या ‘फास्टॅग’ची केवायसी २९ फेब्रुवारीच्या आधी करा

नवी दिल्ली : ‘फास्टॅग’ची केवायसी करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती. केवायसी अद्ययावत करण्याची प्रक्रिया ऑनलाइनही पार पाडता येऊ शकते. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. ‘फास्टॅग’द्वारे महामार्गावर सुलभतेने टोल भरणा केला जातो.  गाडीच्या विंडस्क्रीनवर लावलेल्या टॅगला स्कॅन करून टोल जमा करून घेतला जातो. नोंदणीकृत मोबाइलद्वारे ऑनलाइन फास्टॅग केवायसी पूर्ण केली जाते. मोबाइलद्वारे फास्टॅग वेबसाइटवर लॉगइन करून  ओटीपीच्या आधारे माय प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन केवायसी अद्ययावत करता येते. 

आवश्यक कागदपत्रे
गाडीची आरसी, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र, ओळख व पत्त्याच्या पुरावा, वाहन चालविण्याचा परवाना.

स्थिती अशी तपासा
fastag.ihmcl.com वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ओटीपीद्वारे माय प्रोफाईलमध्ये जाता येते. केवायसी स्टेट्सवर क्लिक करताच फास्टॅगची स्थिती समजते.

Web Title: KYC the FASTag of the car before 29 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.