नवी दिल्ली - 20 वर्षीय अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. काइली जेनर हिनं सर्वात कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे. कमी वयामध्ये सर्वाधिक कमाईच्याबाबतीत काइली जेनरने फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले आहे. आतापर्यंत झुकरबर्ग हा सर्वात तरुण वयात झालेला अब्जाधीश झाला होता. काइली जेनरने वयाच्या दहाव्या वर्षी 'कीपिंग अप विद द कार्दाशियन' या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केलं होते. काइली जेनर किम कर्दाशियनची छोटी बहिण आहे. पाच बहिणींमध्ये काइली जेनर सर्वात लहान आहे.
फोर्ब्स'नं काल अमेरिकेतील 'self-made US billionaire'ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे. काइली जेनरची सध्याची संपत्ती 61 अब्ज 74 कोटी असल्याचे काल फोर्ब्स मासिकानं म्हटलं आहे. तर दोन वर्षापूर्वी सुरु केलेली 'काइली कॉस्मेटिक्स' या तिच्या कंपनीचे एकूण बाजारमूल्य हे 54 अब्ज आहे.
आगामी काही वर्षांमध्ये काइलीच्या संपत्तीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. त्यामुळे त्याचा विक्रम काइलीनं मोडला आहे.
काइलीच्या संपत्तीत आशाच प्रकारची वाढ होत राहिली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती मार्क झुकरबर्गलाही मागे टाकेल.
जेनरने दोन वर्षापूर्वी फक्त 29 डॉलरची (1989.84 रुपये) गुंतवणूक करत 'काइली कॉस्मेटिक्स'ची स्थापना केली होती.
आज 'काइली कॉस्मेटिक्स'चे 63 कोटी डॉलरचे प्रॉडक्ट जगभरात विकले जातात. फोर्ब्स मासिकानुसार, बिजनेस आणि टिव्ही प्रोग्राममुळे काइलीच्या कंपनीचे मुल्य 90 कोटी डॉलर आहे.
फोर्ब्सच्या कवर स्टोरीचा फोटो ट्वीट करत जेनरने 'धन्यवाद फोर्ब्स, या आर्टिकल आणि ओळखीसाठी. मला चांगले वाटते ते मी दररोज करते हे माझं नशीब आहे. जेनरचे इंस्टाग्रामवर 2.5 कोटी फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 1.6 कोटी लोग फॉलो करतात.
thank you @Forbes for this article and the recognition. I’m so blessed to do what i love everyday. #KylieCosmeticspic.twitter.com/CRBwlBByk9
— Kylie Jenner (@KylieJenner) July 11, 2018