भारतीय रेस्तराँ 'इंडियन एक्सेंट'ला सलग दुसऱ्या वर्षी 'La Liste 1000' मध्ये भारतातील नंबर १ रेस्टॉरंट म्हणून निवडण्यात आलं आहे. ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा हेदेखील या रेस्टॉरंटचे गुंतवणूकदार आहेत. दिल्लीतील लोधी हॉटेलमध्ये 'इंडियन एक्सेंट' स्थित आहे. याची सुरुवात रोहित खट्टर यांनी २००९ मध्ये केली होती. न्यूयॉर्क आणि मुंबईतही या त्यांच्या शाखा आहेत. हे त्याच्या स्वादिष्ट जेवण आणि विशेष आदरातिथ्यासाठी ओळखलं जातं.
२०१७ मध्ये लोधीमध्ये जाण्यापूर्वी इंडियन एक्सेंटनं मनोर हॉटेलमध्ये आठ वर्षे काम केले. हे रेस्तराँ आपल्या आधुनिक भारतीय पाककृतींसाठी ओळखलं जातं. सुप्रसिद्ध शेफ शंतनू मेहरोत्रा याची देखरेख करतात. २००९ पासून ते इंडियन एक्सेंटचे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत.
खास पदार्थांमध्ये काय?
यामध्ये सुप्रसिद्ध पदार्थ कलकत्ता झाल आलू आणि पाच प्रकारच्या चवीच्या पाण्यासह पाणीपुरी, सफेद मटार रगड्यासह आलू चाट आणि स्पेअर रिब्स हे त्यांचे विशेष पदार्थ आहेत.
आनंद महिंद्रांनी दिली माहिती
La Liste 1000 मध्ये भारतातील नंबर १ रेस्तराँ निवडलं जाण्याची माहिती उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. 'इंडियन एक्सेंटनं La Liste 1000 मध्ये पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी झाली आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे,' असं आनंद महिंद्रा म्हणाले. यासोबतच त्यांनी आपण यात गुंतवणूकदार असल्याचंही म्हटलं.
१००० ग्लोबल रँकिंगची घोषणा
La Liste 1000 नं जगातील १००० सर्वोत्तम रेस्तराँच्या आपल्या ग्लोबल रँकिंगची घोषणा केली आहे. यामध्ये लंडनमधील २८ रेस्तराँचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक १०० अंक दिले जातात.