Join us

खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अखेर वाढ; १.५ कोटी कर्मचाऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 9:31 PM

देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.  केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.  केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा देशातील जवळपास १.५ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. (labour ministery hikes variable dearness allowance for workers in centeral sphere)

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा १०५ रुपये ते २१० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२१ पासून ही वाढ लागू होणार आहे. या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. महगाई भत्त्यात वाढीचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व संस्थांमधील कर्मचारी, रेल्वे व्यवस्थापन, खाणकाम, तेल उत्पादन आणि प्रमुख बंदर येथील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.  

टॅग्स :केंद्र सरकारव्यवसाय