नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने ई-श्रम पोर्टल (e SHRAM Portal) सुरू केले आहे. देशातील प्रत्येक कामगाराची नोंद या पोर्टलच्या माध्यमातून ठेवली जाईल. जवळपास ३८ कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांना १२ अंकी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) आणि ई-श्रम कार्ड दिले जाईल, जे देशभरात वैध असेल. (Labour Shramik Card Registration: Workers to AVAIL social security BENEFITS after registration on eshram.gov.in)
सरकारच्या या उपक्रमामुळे देशातील लाखो असंघटित कामगारांना नवी ओळख मिळेल.सरकारच्या घोषणेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आता पंतप्रधान श्रमिक योगी धन योजना (PMSYM), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) लाभ मिळू शकेल.
१२ अंकी मिळेल युनिव्हर्सल नंबरकेंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय जवळपास ३८ कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी १२ अंकी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) जारी करेल. यामुळे केवळ कल्याणकारी योजनांची पोर्टेबिलीटीच नव्हे तर संकटाच्यावेळी अनेक फायदेशीर योजनांचा फायदा सुद्धा कामगारांना मिळू शकेल.
अपघाती विम्याची सुविधाएखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्याला दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ मिळेल. यामध्ये सरकारकडून एक वर्षाचा प्रीमियम दिला जाईल. नोंदणीकृत कामगार अपघातात मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास त्यांना दोन लाख रुपये मिळण्याचा हक्क असेल. दरम्यान, अंशतः अपंग झाल्यास विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपये दिले जातील.
असे करा रजिस्ट्रेशन>> e-SHRAM पोर्टलचे अधिकृत पेज https://www.eshram.gov.in वर जा.>> त्यानंतर होम पेजवर "ई-श्रमवर रजिस्ट्रेशन करा" या लिंकवर क्लिक करा. >> यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन https://register.eshram.gov.in/#/user/self वर क्लिक करा.>> सेल्फ रजिस्ट्रेशनवर युजर्सला आपला आधार कार्ड लिंक्ड मोबाईल नंबर अपलोड करावा लागेल.>> कॅप्चा (captcha) प्रविष्ट करा आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (EPFO) सदस्य आहेत की कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पर्यायाचे सदस्य आहेत, हे निवडा आणि ओटीपी पाठविण्यावर क्लिक करा.>> त्यानंतर रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याचे डिटेल्स द्या आणि आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.
मदतीसाठी टोल फ्री क्रमांक पोर्टलमध्ये बांधकाम कामगारांव्यतिरिक्त स्थलांतरित मजूर, पथविक्रेते आणि घरगुती कामगारांचा समावेश आहे. तसेच, कामगारांना नोंदणी करण्यास मदत करण्यासाठी राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १४४३४ देखील सुरू करण्यात आला आहे.