Join us  

Ladki Bahin Yojana : सरकारचं दिवाळी गिफ्ट; लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 9:44 AM

Ladki Bahin Yojana Latest Update : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यावर ५५०० रुपये येणार आहेत.

Ladki Bahin Yojana Update : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

अर्ज करण्याची आजचा शेवटचा दिवसराज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

कसा करायचा अर्ज?लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. 

  • लाडकी बहीण योजनेची वेबसाइट ओपन झाल्यानंतर Applicant Login सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे अकाउंट क्रिएट करा. 
  • यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, गाव याबाबत सर्व माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून साइन अप करा. 
  • यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल. यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून इन करा. 
  • तिथे तुम्ही Application Of Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची आवश्यक माहिती भरा. 
  • यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. 
टॅग्स :लाडकी बहीण योजनेचाएकनाथ शिंदेमहायुतीनिवडणूक 2024