Lokmat Money > बिझनेस न्यूज > Godrej Group Split: एका जमिनीच्या वादाने 124 वर्षांचा गोदरेज समुह तोडला; लवकरच विभाजन होणार

Godrej Group Split: एका जमिनीच्या वादाने 124 वर्षांचा गोदरेज समुह तोडला; लवकरच विभाजन होणार

Godrej Group headed for family split: पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दाेन भागांपैकी एक भाग आदि गाेदरेज आणि त्यांचे भाऊ नादिर यांचा राहणार आहे. तर दुसरा हिस्सा जमशेद गाेदरेज आणि स्मिता गाेदरेज कृष्णा यांचा असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:37 AM2021-10-31T08:37:20+5:302021-10-31T08:37:37+5:30

Godrej Group headed for family split: पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दाेन भागांपैकी एक भाग आदि गाेदरेज आणि त्यांचे भाऊ नादिर यांचा राहणार आहे. तर दुसरा हिस्सा जमशेद गाेदरेज आणि स्मिता गाेदरेज कृष्णा यांचा असेल.

A land dispute split the 124-year-old Godrej group in Family | Godrej Group Split: एका जमिनीच्या वादाने 124 वर्षांचा गोदरेज समुह तोडला; लवकरच विभाजन होणार

Godrej Group Split: एका जमिनीच्या वादाने 124 वर्षांचा गोदरेज समुह तोडला; लवकरच विभाजन होणार

नवी दिल्ली : साबणापासून घरगुती उपकरणे तसेच रिअल इस्टेटपर्यंत पसरलेल्या गाेदरेज समूहाच्या साम्राज्याचे अखेर विभाजन हाेणार आहे. सुमारे ४ अब्ज डाॅलरहून अधिक मूल्य असलेल्या या समूहाची दाेन भावांमध्ये वाटणी हाेणार आहे. १२४ वर्षे जुन्या असलेल्या समूहाची साैहार्दपूर्ण वाटणी करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दाेन भागांपैकी एक भाग आदि गाेदरेज आणि त्यांचे भाऊ नादिर यांचा राहणार आहे. तर दुसरा हिस्सा जमशेद गाेदरेज आणि स्मिता गाेदरेज कृष्णा यांचा असेल. सद्यस्थितीत ७९ वर्षीय आदि गाेदरेज हे समूहाचे अध्यक्ष आहेत. नादिर गाेदरेज हे गाेदरेज इंटस्ट्रीज आणि गाेदरेज ॲग्राेवेटच्या अध्यक्षपदावर आहेत. जमशेद हे आदि आणि नादिर यांचे चुलत भाऊ आहेत. ते गाेदरेज ॲण्ड बाॅयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. विभाजनाबाबत कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले बँक व्यावसायिक निमेश कंपानी आणि उदय काेटक यांच्यासह अनेक कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात येत आहे.

व्यवसायाने वकील असलेले अर्देशिर गाेदरेज यांनी गाेदरेज समूहाची स्थापना १८९७ मध्ये केली हाेती. सुरुवातीला त्यांना अपयश आले हाेते. मात्र, कुलुपांच्या व्यवसायात ते बऱ्याच परिश्रमानंतर यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी हळूहळू विविध उत्पादने बाजारात आणली आणि समूहाचा विस्तार केला. (वृत्तसंस्था)

कुटुंबाचे संयुक्त निवेदन
nविभाजनाबाबत गाेदरेज कुटुंबाने एक संयुक्त निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 
शेअरधारकांचे सर्वाेत्तम हित सुनिश्चित करण्यासाठी गाेदरेज परिवार समूहासाठी काही वर्षांपासून दीर्घकालीन याेजनेवर काम करत आहे. 
nयाचाच भाग म्हणून आम्ही बाहेरील भागदारांकडून सल्ला मागितला आहे. कुटुंबामध्ये याबाबत चर्चा हाेत आहे.
या आहेत समूहाच्या प्रमुख कंपन्या
गाेदरेज ॲण्ड बाॅयस मॅन्युफॅक्चरिंग, गाेदरेज कन्झ्युमर प्राॅडक्ट्स लिमिटेड, गाेदरेज ॲग्राेवेट, गाेदरेज प्राॅपर्टीज आणि गाेदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड इत्यादी कंपन्या समूहामध्ये आहेत. याशिवाय पर्यावरण, आराेग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या २३ ट्रस्टमध्ये समूहाच्या प्रवर्तकांची २३ टक्के हिस्सेदारी आहे.

Web Title: A land dispute split the 124-year-old Godrej group in Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.