नवी दिल्ली : बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक लवकरच त्यांच्या लँडलाईनवरून मोफत कॉलच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. बीएसएनएल ही सरकारी कंपनी एक ‘कन्व्हेजन्स प्लॅटफॉर्म’ तयार करीत असून त्याद्वारे ग्राहकांचे मोबाईल व लँडलाईन कनेक्शन यांना जोडले जाईल.
बीएसएनएलचे चेअरमन आणि प्रबंध संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही दिवाळीपर्यंत फिक्स मोबाईल ‘कन्व्हेजन्स प्लॅटफॉर्म’ सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यामुळे ग्राहक मोबाईल फोनवर मूल्यवर्धित सेवेचा लाभ घेऊ शकतील. जर त्यांच्याकडे लँडलाईन सेवा असेल तर ते रात्री मोबाईलवर मोफत कॉल करू शकतात. याशिवाय त्यांना अन्य काही आधुनिक सुविधाही उपलब्ध होतील.
श्रीवास्तव म्हणाले की, ही योजना पेश केल्यानंतर ग्राहक आपले मोबाईल आणि लँडलाईन खाते जोडू शकतील. या दोन्ही खात्यात एक प्रकारचा समन्वय राहील.
लँडलाईन ते मोबाईल मोफत कॉलची सुविधा
बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक लवकरच त्यांच्या लँडलाईनवरून मोफत कॉलच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. बीएसएनएल ही सरकारी कंपनी एक ‘कन्व्हेजन्स प्लॅटफॉर्म’ तयार करीत
By admin | Published: October 18, 2015 11:01 PM2015-10-18T23:01:56+5:302015-10-18T23:01:56+5:30