Lokmat Money > बिझनेस न्यूज > चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या L&T ला मोठी ऑर्डर मिळाली आहे. जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:31 PM2023-09-07T20:31:30+5:302023-09-07T20:32:12+5:30

चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या L&T ला मोठी ऑर्डर मिळाली आहे. जाणून घ्या...

LandT Company's Big Role in Chandrayaan-3; Now an order worth 33 thousand crores has been received from Saudi Arabia | चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

चंद्रयान-3च्या प्रक्षेपणात निभावली मोठी भूमिका; आता सौदीमधून मिळाली 33 हजार कोटींची ऑर्डर

Chandrayaan-3: भारताच्या चंद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या उतरुन इतिहास रचला. त्या दिवसापासून या मिशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खासगी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. यातील एक इंजीनिअरिंग आणि कंसट्रक्शन कंपनी L&T म्हणजेच Larsen & Toubro आहे. या कंपनीला जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी सौदी अरामकोकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 4 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 33 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीला कोणती ऑर्डर मिळाली ?
या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्येही विक्रमी वाढ झाली असून, हा 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 4.55 टक्क्यांनी उसळी घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडला सौदी आरामकोकडून सुमारे $4 अब्ज किमतीच्या दोन ऑर्डर मिळाल्या आहेत. सौदी अरामकोने पूर्व प्रांतात $110 अब्ज डॉलरचा जाफुराह गॅस प्रकल्पाची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी बांधकाम आणि इंजीनिअरिंग कामाच्या ऑर्डर लार्सन अँड टुब्रोला देण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ
या माहितीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर 4.26 टक्क्यांनी वाढून 2847.05 रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये 4.55 टक्क्यांची वाढ दिसून आली. कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही 16368 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीचा एमकॅप 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

चंद्रयानमध्ये कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान 
मल्टी नॅशनल कंपनी लार्सन टुब्रोने चंद्रयान मिशनच्या प्रक्षेपणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीने मिशनसाठी बूस्टर सेगमेंट्स तयार केले आणि पवई येथील L&T च्या सुविधेवर दबाव चाचणी करण्यात आली. कंपनीने भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी प्रक्षेपण वाहनांच्या सिस्टम इंटिग्रेशनमध्येदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

Web Title: LandT Company's Big Role in Chandrayaan-3; Now an order worth 33 thousand crores has been received from Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.