- प्रसाद गो. जोशी
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले आशादायक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल मूडीजने वर्तविलेले आशादायक भाकीत आणि कमी किमतीचा फायदा घेत करण्यात आलेली मोठी खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली. सन २०१६ या वर्षामधी ल ही सर्वाधिक साप्ताहिक वाढ ठरली आहे.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा तेजीचा दिसून आला. शुक्रवारी बाजाराला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुटी असल्याने बाजारात चारच दिवस व्यवहार झाले. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ७२३ अंशांनी (म्हणजे ३.१५ टक्के) वाढून २३७०९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३.२९ टक्के म्हणजे २३० अंशांनी वाढून ७२११ अंशांवर स्थिरावला. आॅक्टोबर २०१५ नंतर बाजाराने दिलेली ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वगळता अन्य सर्व निर्देशांक वाडीव पातळीसर बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांक अनुक्रमे १.९५ आणि दोन टक्कयांनी वाढून बंद झाले. मात्र सप्ताहामध्ये या निर्देशांकांची वाढ संवेदनशील निर्देशांकापेक्षा कमी झाली, हे विशेष.
गेले काही महिने भारतीय बाजारात सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्येही मोठ्या प्रमाणावर विक्री करून आपली गुंतवणूक काढून घेणे सुरूच ठेवले. चार दिवसांमध्ये या संस्थांनी आपल्याकडील २३६५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. सप्ताहामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्येही ०.०८ टक्कयांची घट होऊन ते ६८.४९ असे बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे जागतिक मंदीची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये खरेदीने जान आणलेली दिसून आली.
आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था मूडीजने भारताचा वाढीचा दर ७.५ टक्के राहील, असे म्हटले आहे.
कॅलेंडर वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले आशादायक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल मूडीजने वर्तविलेले
By admin | Published: February 22, 2016 02:04 AM2016-02-22T02:04:56+5:302016-02-22T02:04:56+5:30