लार्सन अँड टुब्रो ही देशातील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही कंपनी देशात सेवा देत आहे, लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एएम नाईक हे सहा दशके सेवा बजावल्यानंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी कंपनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. कंपनी त्यांच्या सन्मानार्थ भागधारकांना ६ रुपयांचा विशेष लाभांश देत आहे. त्यांच्या सेवेच्या प्रत्येक दशकासाठी एक रुपया विशेष लाभांश दिला जाणार आहे. तसेच कंपनीने मार्च, २०२३ मध्ये आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्याचा २४ रुपये प्रति इक्विटी शेअररचा अंतिम लाभांश घोषित केला. सोमवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर १.१२ टक्क्यांच्या वाढीसह २६७९.९० रुपयांवर बंद झाले.
Post Office च्या ५ जबरदस्त योजना; पैसे वाढतच जातील, बंपर परतावा मिळेल
कंपनीचे सीईओ आणि एमडी एस एन सुब्रमण्यम यांनी ३१ जुलै रोजी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी असं म्हटले की, बोर्डने नाईक यांचे सन्मान करण्यासाठी शेअर होल्डर्स यांना प्रत्येक शेअरला सहा रुपयांचा स्पेशल डिव्हीडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. ए.एम. नाईक यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि कृतज्ञता दर्शविण्याचे ते प्रतीक आहे. आपल्या सहा दशकांच्या सेवेत त्यांनी कंपनीला खूप उंचीवर नेले आहे. नाईक ३० सप्टेंबर २०२३ रोजी L&T मधून निवृत्त होत आहेत.
५८ वर्षे L&T चे नेतृत्व केल्यानंतर ते आता कंपनीच्या नेतृत्वावरून पदभार सोडत आहेत. त्यांना मंडळाने अध्यक्ष एमेरिटसचा दर्जा दिला आहे. नाईक यांना एकदा L&T नोकरी नाकारण्यात आली होती. त्यांनी गुजरातमधील बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि नंतर एल अँड टी मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. पण त्याला कंपनीने नकार दिला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना त्या वेळी एल अँड टीमध्ये अधिक पसंती दिली जात होती. पुढे त्यांची कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती झाली. १५ मार्च १९६५ रोजी ते L&T मध्ये नोकरीवर रुजू झाले.
नाईक यांना १९९९ मध्ये कंपनीचे सीईओ बनवण्यात आले. जुलै २०१७ मध्ये ते L&T समूहाचे अध्यक्ष झाले. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने खूप प्रगती केली. कंपनीची एकूण मालमत्ता आता ४१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अभियांत्रिकीसोबतच कंपनीने संरक्षण, आयटी आणि रिअल इस्टेटमध्येही पाऊल टाकले. आज L&T च्या ९० टक्के महसूल नाईक यांनी सुरू केलेल्या या व्यवसायांमधून येतो.