Join us

'या' महत्त्वाच्या कामांसाठी उरलेत अखेरचे २ दिवस; काम संपवा अन्यथा होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 4:45 PM

अशी अनेक कामे आहेत जी तुम्हाला या महिन्यात म्हणजे जूनमध्ये पूर्ण करायची आहेत. असं न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

जून महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. यानंतर जुलै महिना सुरू होईल. अशी अनेक कामे आहेत जी तुम्हाला या महिन्यात म्हणजे जूनमध्ये पूर्ण करायची आहेत. असं न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या टाळायच्या असतील तर ही कामं त्वरित पूर्ण करा. यामध्ये आधार-पॅन लिंकपासून बँक लॉकर करारापर्यंत अनेक कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. ३० जूनपर्यंत तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत ते पाहू.

आधार पॅन लिंक३० जूनपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. आधार-पॅन लिंकची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. हे लिंक न केल्यास इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला करता येणार नाही. तसंच पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. यापूर्वी याची अंतिम तारीख ३१ मार्च होती.

बँक लॉकर अॅग्रीमेंटतुम्ही बँक लॉकर अॅग्रीमेंट ३१ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी जमा केलं असेल, तर तुम्हाला नवीन बँक लॉकर अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची आग किंवा चोरी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं नवीन धोरण तयार केलं आहे. जर ग्राहकांनी लॉकर अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी केली नाही तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेशी संबंधित नवीन नियम लागू होणार नाहीत.

अॅडव्हान्स्ड टॅक्सजर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करत असाल. जर तुमचा कर १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी तो दिलेल्या मुदतीत भरणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वेळेत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर तुम्हाला पहिल्या तीन हप्त्यांवर ३ टक्के आणि शेवटच्या हप्त्यावर १ टक्के दरानं एकूण अॅडव्हान्स टॅक्सच्या रकमेवर इंटरेस्ट द्यावा लागेल.

टॅग्स :बँकआधार कार्ड