Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच वर्षांत झाले २३ हजार बँक घोटाळे!, रिझर्व्ह बँकेची माहिती

पाच वर्षांत झाले २३ हजार बँक घोटाळे!, रिझर्व्ह बँकेची माहिती

मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांमध्ये झालेले तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:14 AM2018-05-03T05:14:29+5:302018-05-03T05:14:29+5:30

मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांमध्ये झालेले तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे

In the last five years, 23 thousand bank scams! Reserve Bank information | पाच वर्षांत झाले २३ हजार बँक घोटाळे!, रिझर्व्ह बँकेची माहिती

पाच वर्षांत झाले २३ हजार बँक घोटाळे!, रिझर्व्ह बँकेची माहिती

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत देशातील विविध बँकांमध्ये झालेले तब्बल २३ हजार बँक घोटाळे उघडकीस आले असून, या घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २0१७ ते १ मार्च २0१८ या वर्षभराच्या काळात सर्वाधिक ५,१२५ बँक घोटाळे उघडकीस आले. या काळात सर्वाधिक २८ हजार ४५९ कोटी रुपयांची रक्कम घोटाळ्यात अडकली.
सन २0१६-१७ मध्ये ५,0७६ बँक घोटाळे उघड झाले. या घोटाळ्यात अडकलेली रक्कम २३ हजार ९३३ कोटी रुपये होती, तसेच २0१३ ते मार्च २0१८ या काळात २३,८६६ बँक घोटाळे उघडकीस आले. त्यापैकी प्रत्येक घोटाळ्यातील रक्कम १ लाख रुपयांपेक्षा अधिक असून, सर्व घोटाळ्यांत मिळून १,00,७१८ कोटी रुपयांचा फटका बँकांना बसला आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, २0१५-१६ मध्ये ४,६९३ बँक घोटाळे झाले. त्यात बँकांना १८ हजार ६९८ कोटी रुपयांचा फटका बसला. सन २0१४-१५ मध्ये ४,६३९ घोटाळे झाले. त्यातून बँकांचे १९ हजार ४५५ कोटी रुपये बुडाले, तर २0१३-१४ मध्ये ४,३0६ घोटाळ्यांत बँकांचे १0,१७0 कोटी रुपये बुडाले.

Web Title: In the last five years, 23 thousand bank scams! Reserve Bank information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.