मुंबई - एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणाºया तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सवलतीचा नेमका आकडा निवेदनात देण्यात आलेला नाही. तथापि, एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी होणाºया बुकिंगवर एअर इंडियाकडूनसरसकट ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.जेट एअरवेज जमिनीवर आल्यानंतर विमान तिकिटे प्रचंड महागली आहेत. ऐनवेळच्या प्रवासासाठी तर विमान कंपन्या अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताची राष्ट्रीय विमान वाहतूक सेवाप्रवाशांच्या मदतीला धावून आली आहे. सुट्यांच्या हंगामात ही प्रवाशांसाठी बंपर आॅफर ठरणार आहे.एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार, विमान उड्डाणाच्या तीन तास आधी ऐनवेळच्याबुकिंगअंतर्गत विकण्यात येणाºया तिकिटांवर मोठी सवलत दिली जाणार आहे.सूत्रांनी सांगितले की, शेवटच्या क्षणी केल्या जाणाºया विमान तिकिटाच्या बुकिंगवर प्रवाशांना सामान्यत: सुमारे ४० टक्के जास्त पैसे मोजावे लागतात. काही कंपन्या तर त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारतात. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर तिकिटांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात नेहमीच्या तफावतीपेक्षा अधिक तफावत निर्माण झाली आहे.असे करता येईल तिकिटांचे बुकिंगआता ग्राहकांना शेवटच्या क्षणी अधिक स्वस्तात तिकिटे मिळविता येतील. एअर इंडियाच्या नियमित काऊंटरवरून, कंपनीच्या वेबसाईटवरून, मोबाईल अॅपवरून अथवा तिकीट एजंटांच्यामाध्यमातून तिकिटे बुक केली जाऊ शकतात.
लास्ट मिनिट बुकिंगवर सूट, एअर इंडियाच्या अधिकाऱ्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:03 AM