- उमेश शर्मा
अर्जुन : कृष्णा, जीएसटी रिटर्न दाखल न केल्यामुळे नोंदणीकृत करदात्यांची नोंदणी रद्द झाल्यास, अशा करदात्यांचे काय होईल?
कृष्ण : अर्जुना, रिटर्न दाखल न केल्यामुळे ज्या करदात्यांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत, असे करदाते रद्द नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, सप्टेंबर २०२० पर्यंत त्यांना रिटर्न दाखल करावे लागतील. ज्या करदात्यांची नोंदणी १२ जून २०२० पर्यंत रद्द करण्यात आली आहे, त्यांनाही या सवलतीसाठी अर्ज करता येईल. जीएसटी परिषदेच्या चाळिसाव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अर्जुन : कृष्णा, ‘जीएसटीआर-३ बी’साठी अधिसूचित लेट फी संबंधी अनेक गोंधळ निर्माण होऊ शकतात. या संबंधी कोणती सुधारणा जाहीर केली आहे?
कृष्ण : अर्जुना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीएसटी करदात्यांना काहीसा दिलासा दिला आहे. जीएसटी लागू झाल्यापासून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी फॉर्म जीएसटीआर-३बीसाठी पाचशे रुपये प्रतिरिटर्न लेट फी आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ३० सप्टेंबर २०२० पूर्वी जीएसटीआर-३ बी दाखल करण्याची अट घातली आहे.
अर्जुन : कृष्णा, कमी झालेली लेट फी कोणत्या कालावधीच्या रिटर्नसाठी लागू आहे?
कृष्ण : अर्जुना, फेब्रुवारी ते एप्रिल २०२० या कालावधीच्या रिटर्नसाठी दिलासा देण्यात आला होता. त्याच सोबत जुलै २०१७ ते जानेवारी २०२० या कालावधीतील पेंडन्सी संपवण्यासाठी या काळात असलेल्या रिटर्नसच्या लेट फीवरही दिलासा देण्यात आला होता. या बरोबरच मे ते जुलै २०२० या कालावधीत आकारण्यात येणाऱ्या लेट फीवर दिलासा देण्यासाठी विविध निवेदने देण्यात आली. जुलै २०१७ ते जुलै २०२० या कालावधीसाठी असलेले जीएसटीआर-३ बी सप्टेंबर २०२० पर्यंत दाखल केल्यास त्यावर जास्तीत जास्त ५०० रुपये प्रतिरिटर्न लेट फी लागू केली जाईल. हा दिलासा करदात्यांना मिळेल.
अर्जुन : कृष्णा, नील टॅक्स लाएबिलिटी असणाºया करदात्यांसाठी फॉर्म जीएसटीआर ३बी साठी किती लेट फी लागू होईल ?
कृष्ण : अर्जुना, सीबीआयसीने अधिसूचित केल्यानुसार नील टॅक्स लाएबिलिटी असणाºया करदात्यांसाठी नील लेट फी लागू असेल. टॅक्स लाएबिलिटी असणाºया करदात्यांवर जास्तीत जास्त ५०० रुपये प्रतिरिटर्न फॉर्म जीएसटीआर ३बी ३० सप्टेंबर २०२०पर्यंत दाखल केल्यास लागू होईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यामधून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, सीबीआयसीने लेट फीमध्ये घट केली आहे. एक समान लेट फी लागू करण्यासाठी अत्यंत सोपी आहे. ज्यांनी जुलै २०१७ ते जुलै २०२० पर्यंत कोणतेही रिटर्न दाखल केले नाहीत, असे जीएसटीआर ३बीचे डिफॉल्टर्स या सवलतीचा फायदा घेऊ शकतात. ज्या करदात्यांनी यापूर्वी लेट फी भरली असेल, त्यांच्या बाबत काही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याच बरोबर जीएसटीआर-४बाबत दिलासा देण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागेल.
कोणासाठी लागू होणार जीएसटीची लेट फी?
टर्न दाखल न केल्यामुळे ज्या करदात्यांच्या नोंदणी रद्द करण्यात आल्या आहेत, असे करदाते रद्द नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:25 AM2020-07-06T03:25:06+5:302020-07-06T03:26:04+5:30