नवी दिल्लीः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. एनसीआरमध्ये सीएनजीची किंमत 90 पैसे प्रति किलोग्राम वाढवली आहे. गेल्या 15 महिन्यांत सीएनजीच्या किमतीत सातव्यांदा वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं सांगितलं की, गॅस पाइपलाइनच्या ट्रान्समिशन शुल्कात होत असलेल्या बदलामुळे ही वाढ करण्यात आली आहे. एप्रिल 2018पासून सीएनजीची किंमत आतापर्यंत सातव्यांदा वाढली आहे. एप्रिल 2018मध्ये सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलोग्राम 1 रुपयाचा वाढ केली होती.त्याचदरम्यान घरगुती नैसर्गिक गॅसची किंमत वाढली आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत झाला होता. एप्रिल 2018पासून आतापर्यंत सीएनजीची किंमत 6.89 रुपये प्रति किलोग्रॅम वृद्धी झाली आहे. दिल्लीत सीएनजीची किंमत 90 पैशांनी वाढून 46.60 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 1 रुपये प्रति किलोग्रॅमनं वाढून 52.95 रुपये झाली आहे.हरियाणातील रेवाडी, गुरुग्राम आणि कर्नालमध्ये सीएनजीची किंमत 95 पैसे प्रतिलिटर वाढवली आहे. गुरुग्राम आणि रेवाडीमध्ये पुरवठा करणाऱ्या सीएनजीची किंमत 58.45 रुपये प्रतिकिलोग्रॅम आहे. तर कर्नालमध्ये प्रतिकिलोग्रॅम सीएनजीसाठी 55.45 रुपये मोजावे लागणार असल्याचं इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं सांगितलं आहे.
breaking- CNG एवढ्या रुपयांनी महागला, 15 महिन्यांत सातव्यांदा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 7:18 PM