Join us

जबरदस्त! 'या' बिहारी बाबूनं गुगल, मायक्रोसॉफ्टला ठेवलंय भाडेकरू, भाड्यातून कमावतो ७६९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 1:49 PM

बिहारमधील रहिवासी असलेल्या बिजय अग्रवाल यांनी दुकानाच्या व्यवसायापासून सुरुवात केली होती.

कष्ट केल्यानं कधी ना कधी फळ मिळतं असं बोललं जातं. शून्य विश्व निर्माण करणारी उदाहरणे आपण बरीच पाहिली आहेत. एखादे काम करण्याचा निश्चय केला तर सर्व अडचणींनंतरही यश नक्कीच मिळते, असे म्हणतात. सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. बिहारच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या विजय अग्रवाल यांनी हे करुन दाखवलं आहे. त्यांनी ५ हजार रुपयांच्या पगाराच्या नोकरीपासून सुरुवात केली होती ते आज ५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. 

Cryptocurrency : क्रिप्टो इन्व्हेस्टर्सची होणार चांदी, १.२० लाख डॉलर्सपर्यंत वाढणार बिटकॉईनचा भाव

त्यांनी आपल्या भावाच्या दुकानातून व्यवसायाच्या युक्त्या शिकलेले विजय अग्रवाल आज फक्त भाड्यातून ७६९ कोटी रुपयांहून अधिक कमावतात. हैदराबादमधील त्यांच्या एका इमारतीचे भाडे दरमहा ४.१४ कोटी रुपये आहे.

सत्त्व ग्रुपचे एमडी विजय अग्रवाल हे बिहारमधील एका छोट्या शहरातील आहेत. ते बिहारच्या किशनगंजचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील १९६५ साली बांगलादेशातून भारतात आले. वडील छोटासा व्यवसाय करायचे. विजय ९ भावंडांसोबत किशनगंजमध्ये एका छोट्या घरात राहत होते. सोयी-सुविधा मर्यादित होत्या, त्यामुळे बालपण उणीवांसह गेले. त्यांच्या बहिणीचे लग्न झाल्यावर ते तिच्यासोबत पश्चिम बंगालच्या राजीगंज येथे गेले. त्यांचे नातेवाईक दुकान चालवायचे. त्याच दुकानात विजय हे मदत करायचे. या दुकानातून त्यांनी व्यवसायाच्या युक्त्या शिकून घेतल्या. यावेळी त्यांना मार्केटिंगपासून ते ग्राहकांशी बोलणी कशी करायची हे सगळं शिकवलं.

१९८५ मध्ये, ते तेथून कोलकाता येथे गेले, तेथे ते एका वित्तीय निगम कंपनीत रुजू झाले. त्यांची कंपनी बिल्डरांचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करत असे. येथे त्यांनी बांधकामाशी संबंधित कामे शिकून घेतली.

१९९३ मध्ये, त्यांचे गुरू जीडी सालारपुरिया यांच्यासमवेत त्यांनी बंगळुरूमध्ये त्यांचा पहिला प्रकल्प सुरू केला. २००० मध्ये त्यांनी अनेक छोटे-मोठे प्रकल्प सुरू केले. त्याच्या प्रगतीची कहाणी इथून सुरू झाली. या दोघांनी मिळून सालारपुरिया-सत्व ग्रुप ही कंपनी सुरू केली. ICRA च्या २०२१ च्या अहवालानुसार, त्यांच्या कंपनीने ५५.४ कोटी स्क्वेअर फूट एरिया तयार केला आहे. २०२१ पर्यंत कंपनीचे भाडे उत्पन्न ७६१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

त्यांची कंपनी गेल्या ३४ वर्षांपासून बेंगळुरूमध्ये आहे. आता त्यांनी हैदराबादमध्येही पाय पसरायला सुरुवात केली आहे. या शहरांमध्ये Sattva ग्रुप फक्त भाडेतत्त्वावर आणि भाड्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. जेपीएमसी, मायक्रोसॉफ्ट, नोव्हार्टिस, गुगल यांसारख्या बड्या कंपन्या विजय अग्रवाल यांच्या भाडेकरू आहेत. २०२० पूर्वी त्यांचे भाड्याचे उत्पन्न ८५७ कोटी रुपयांवर पोहोचले होते. कोरोनामुळे कंपनीचेही नुकसान झाले आहे. २०२० मध्ये कंपनीचा परिचालन महसूल १७३० कोटी रुपये होता आणि नफा ५८१.४ कोटी रुपये होता. ऑनलाइन प्रकल्प पूर्ण करून त्यांनी आपल्या कंपनीची प्रतिष्ठा कायम ठेवली. त्याने इंटेलचा एक प्रकल्प ९० दिवसांऐवजी ६७ दिवसांत पूर्ण केला.

विजय अग्रवाल यांची नेट वर्थ २०२१ च्या हुरुन रिच लिस्टनुसार त्यांची एकूण संपत्ती ४१७० कोटी रुपये होती. विजय अग्रवाल यांनी छोटंसं शहर सोडून मोठं स्थान मिळवलं आहे. जे स्वतः दुकानात काम करायचे ते आज करोडोंची कंपनी चालवत आहेत. ५ लोकांसोबत त्यांनी आपली कंपनी सुरू केली, आज १६०० कर्मचारी काम करत आहेत. त्यांची कंपनी एरो अॅक्सेसरीज, फॅसिलिटी, वेअरहाऊस, आयटी तसेच आता शिक्षण क्षेत्रातही काम करत आहे. ग्रीनवुड इंटरनॅशनल स्कूल हा याच गटाचा एक भाग आहे.

टॅग्स :व्यवसायगुगल