नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेनं 20 रुपयांची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेवर अनेक अतिरिक्त सुरक्षा फीचर देण्यात आले आहेत. नोटाबंदीनंतर केंद्रीय बँकेनं 10, 50, 100, 200, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. या सर्व नोटा महात्मा गांधींच्या सीरिजमधील आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेवर ऐतिहासिक एक फोटो आहे. हा फोटो महाराष्ट्रातील अजिंठा गुफेचाही असू शकतो. अजिंठा गुफेला युनेस्कोनं जागतिक वारसा यादीत स्थान दिलं आहे. 20 रुपयांची नवी नोट ही जुन्या नोटेपेक्षा 20 टक्के छोटी असणार आहे. नव्या आणि अतिरिक्त सुरक्षा फीचरचा या नोटेमध्ये बंदोबस्त करण्यात आला आहे. 20 रुपयांची नवी नोट ही नोटाबंदीनंतर बाजारात येणारी 7वी नवी नोट ठरणार आहे. परंतु नव्या नोटेच्या रंगाबाबत आरबीआयनं कोणताही खुलासा केलेला नाही.
मीडिया रिपोर्ट्नुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग लाल असू शकतो. ही नोटही महात्मा गांधींच्या सीरिजमधलीच असणार आङे. या नोटेची रंगसंगती आणि आकार आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या नोटेपेक्षा वेगळा असणार आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, मार्च 2018मध्ये देशात 20 रुपयांच्या 10 कोटींच्या नव्या नोटा चलनात होत्या. मार्च 2016मध्ये 4.92 कोटींच्या मुकाबल्यात हा आकडा दुप्पट होता. मार्च 2018पर्यंत चलनात असलेल्या 20 रुपयांच्या नोटांची एकूण भागीदारी बाजारात 9.8 टक्के एवढी आहे. रिझर्व्ह बँकेनं काही महिन्यांपूर्वी 100 रुपयांची नवी नोटही जारी केली होती. आरबीआयनं जुलैमध्येच या नोटेची घोषणा केली होती.
RBI लवकरच बाजारात आणणार 20 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या कशी आहे रंगसंगती
भारतीय रिझर्व्ह बँकेनं 20 रुपयांची नवी नोट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:42 PM2018-12-25T14:42:44+5:302018-12-25T14:43:05+5:30