लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय बँकिंग क्षेत्राचे अधिक स्वच्छ पद्धतीने संस्थात्मकीकरण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ईझ-४.० कार्यक्रमाचा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते बुधवारी प्रारंभ करण्यात आला.
‘ईझ’चा अर्थ ‘वाढीव संपर्क आणि सेवा सर्वोत्कृष्टता’ असा असून, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ईझ-३.० चा हा पुढील टप्पा आहे. ईझचा पहिला टप्पा जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. दोन दिवसीय मुंबई भेटीवर असलेल्या सीतारामन यांनी ईझ-४.० ची घोषणा केली.
ईझ-४.० ची ठळक वैशिष्ट्ये अशी :
nसीतारामन यांनी सांगितले की, बँकांनी राज्य सरकार, निर्यातदार आणि औद्योगिक संघटना यांच्याशी समन्वय साधून काम करावे.
nझारखंड, प. बंगाल आणि ओडिशा यांसारख्या पूर्वेकडील राज्यांचा कर्ज पुरवठा वाढविण्यात यावा. ईशान्य भारतासाठी आराखडा तयार करावा.
nअनेक उगवत्या क्षेत्रांना आर्थिक साह्याची गरज आहे. त्यांना बँकांनी साहाय्य करावे.
nफिन्टेक क्षेत्रासाठी बँकांनी विशेषत्वाने अर्थसाहाय्य करावे. गेल्या काही वर्षांत फिन्टेक स्टार्टअप्सनी वित्तीय क्षेत्राचा चेहरामोहरा बदलवून टाकला आहे.