Join us

मारूती सुझुकीची स्विफ्ट 2017 लॉन्च

By admin | Published: March 08, 2017 11:52 AM

आघाडीची कार निर्माती कंपनी मारूती सुझुकीने ग्राहकांच्या पसंतीची कार स्विफ्टचं नवं मॉडेल स्विफ्ट 2017 लॉन्च केलं

 ऑनलाइन लोकमत

जिनिव्हा, दि. 8 - आघाडीची कार निर्माती कंपनी मारूती सुझुकीने  ग्राहकांच्या पसंतीची कार स्विफ्टचं नवं मॉडेल स्विफ्ट 2017 लॉन्च केलं आहे.  जिनिव्हा येथे 2017 इंटरनॅशनल मोटार शोमध्ये त्यांनी स्विफ्ट 2017 ही कार युरोपियन मार्केटसाठी लॉन्च केली. एप्रिल 2017 पासून या कारच्या विक्रीला सुरूवात होईल. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा 2018 च्या सुरूवातीला ही गाडी भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. 

नव्या स्विफ्ट 2017 मध्ये नवे अपडेट्स आणि नवे फीचर आहेत. 'HEARTECT' प्लॅटफॉर्मवर या कारला बनवण्यात आलं आहे. कारची चेसिस हलकी असून पुर्वीपेक्षा जास्त मजबूत आहे त्यामुळे कारचं वजन कमी झालं आहे. वजन कमी झाल्याने इंजिनवरचा दबाव कमी झाल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे कारचा एव्हरेज वाढू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे.  
 
 या कारमध्ये  1.0-लीटर बूस्टरजेट इंजिन आणि 1.2-लिटर डु्यअल जेट इंजिनचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. भारतामध्ये लॉन्च केल्यावर इंजिनसाठी दोन पर्याय देण्यात येणार की नाही याबबात कंपनीने माहिती दिलेली नाही. 
 
सध्याच्या स्विफ्टशी तुलना करता लांबीच्या बाबतीत ही गाडी 10mm छोटी आहे. शिवाय व्हिलस्पेस 20mm जास्त असल्याने केबिन स्पेससाठी जास्त जागा आहे. जुन्या स्विप्टपेक्षा या गाडीची उंची  15mm कमी आहे.  
 
 गाडीमध्ये नवं बंपर आणि ग्रिल देण्यात आलं आहे तर गाडीच्या मागील बाजूस   LED टचसोबत नवं बंपर  आणि टेल लॅम्प देण्यात आला आहे. यामध्ये  अॅन्ड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.  
या कारची किंमत 5.50 लाख ते 8.50 लाख रूपये  (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) असण्याची शक्यता आहे.