Join us  

एसएमएफजी इंडियाक्रेडिटद्वारे १०००व्या शाखेचा आरंभ; विशेष आवरण, माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 12:19 PM

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि., भारताची गैर-बँकींग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असून, त्यांनी वाशी, नवी मुंबई इथे आपल्या १००० व्या शाखेच्या आरंभाची घोषणा केली आहे.

मुंबई:  एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि., भारताची गैर-बँकींग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असून, त्यांनी वाशी, नवी मुंबई इथे आपल्या १००० व्या शाखेच्या आरंभाची घोषणा केली आहे. या लक्षणीय प्रसंगामुळे देशभरातील आपला विस्तार करण्यामागील आणि अद्याप शिरकाव न झालेल्या बाजारपेठांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यातील कंपनीची अढळ निष्ठा दृढ झाली आहे. या लक्षणीय मैलाच्या टप्प्याच्या निमित्त, एमएमएफजी इंडिया क्रेडिटनं इंडिया पोस्टसोबत सहयोग करुन एक विशेष आवरण आणि माय स्टँपप्रकाशित केले. 

या अधिकृत अनावरण प्रसंगी योगी कोजी, कॉन्सुल-जनरल,जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट-जनरल, अभिजीत बनसोडे, संचालक – टपाल सेवा (मुख्यालय) महाराष्ट परिमंडळ, सोबत शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट हे मान्यवर उपस्थित होते. १००० व्या शाखेचा आरंभ म्हणजे भव्य आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेच्या अंतर्गत आपली उपस्थिती आणखी खोलवर नेण्याच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची ही पावती आहे. २००७ मध्ये स्थापना झाल्यापासून, कंपनीने निरंतर वृद्धिचा पाठपुरावा करत, एकअखिल-भारतीय संस्थेत रुपांतर केले आहे जी आता ६७० हून अधिक शहरं आणि ७०,००० गावांमध्ये कार्यरत असून, २३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचं पाठबळ तिला लाभलं आहे. मागील दोन वर्षांमध्ये, एमएमएफजी इंडिया क्रेडिटने अंदाजे ३०० नवीन शाखांची भर घातली असून, यापैकी लक्षणीय ९५% शाखा स्तर-२+ शहरं आणि अर्ध-ग्रामीण भागांमध्ये स्थापन केलेल्या आहेत. 

हा विस्तार संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येला औपचारिक पत पुरवठादेण्यासाठी कंपनीच्या मोहिमेशी सुसंगत आहे, त्याद्वारे त्यांना वित्तीयस्वातंत्र्य साध्य करण्याची शक्ती मिळाली आहे. शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट, यांनी या भव्य प्रसंगाबाबतबोलताना सांगितलं, "आमच्या १००० व्या शाखेचं उद्घाटन एक लक्षणीय टप्पा आहे जो संपूर्ण भारतातील लोकांना औपचारिक पत पुरवठा करण्यातील आणि त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्यात मदत करण्यामधील आमची सखोल वचनबद्धता दर्शवतो. आम्ही ही कामगिरी साजरी करत असताना, टपाल विभागाच्या सहयोगाने एक विशेष आवरण आणि माय स्टँपप्रकाशित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, ही घटना कंपनीने आजवर साध्य केलेल्या वृद्धिची आणि भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील योगदानाची द्योतक आहे. आमचा प्रवास निरंतर बदलत राहण्याचा, ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याचा त्याचबरोबर सर्वांसाठी वित्तीय सेवा उपलब्ध करणे आणि समाधानी वृद्धी गाठण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या मोहिमेशी जुळणारा आहे.” 

हा मैलाचा टप्पा न केवळ कंपनीच्या वृद्धी धोरणाचे यश ठळकपणे मांडत नाही तरभारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील एक अत्यावश्यक योगदानकर्ता म्हणून आपल्या भूमिकेची पुन्हा पुष्टी देखील करतो. १००० व्या शाखेच्या उद्घाटनाद्वारे, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने प्रत्येक भारतीयासाठी पसंतीची वित्तीय भागीदार बनण्याच्या आपल्या ध्येयामध्ये आणखी यश गाठण्यासाठी मंच निर्माण झाला आहे.