Join us  

पॅनासॉनिकचा एल्युगा प्योर स्मार्टफोन लाँच

By admin | Published: March 23, 2017 11:22 AM

तंत्रज्ञानात नावाजलेली कंपनी असलेल्या पॅनासॉनिकनं एल्युगा प्योर हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - तंत्रज्ञानात नावाजलेली कंपनी असलेल्या पॅनासॉनिकनं एल्युगा प्योर हा स्मार्टफोन लाँच केला आहे. पॅनासॉनिक एल्युगा प्योर हा फोन फारच कमी किमतीत मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, त्यांचं 720 पिक्सल रिझॉल्युशन आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक एमटी 6737 क्वाड कोर 1.25GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ड मेमरीही देण्यात आली आहे. फोनच्या मेमरीला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवण्यातही येऊ शकते. या फोनमधल्या अॅपद्वारे ग्राहक पॅनासॉनिकचे स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशिनलाही नियंत्रित करू शकतात. या स्मार्टफोन अँड्रॉइड 6.0 सिस्टीमवर काम करतो. फोनमध्ये 13 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आहे, तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 2900एमएएच एवढी असून, ती फोनमधून काढता येणार नाही. फोनचं वजन 160 ग्रॅम आहे. पॅनासॉनिक एल्युगा प्योर या स्मार्टफोनमध्ये सिंगल सिमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वायफाय, जीपीएस सेन्सर, प्राक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर आणि अँबीअन्ट लाइट सेन्सरही बसवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पॅनासॉनिकनं एल्युगा पल्स आणि एल्युगा पल्स एक्स हे स्मार्टफोनही लाँच केले होते. हे दोन्ही फोन ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून सेलसाठी उपलब्ध आहेत.