Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स, टाटा अन्..; अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये छाटणी, एका वर्षात 52 हजार नोकऱ्या गेल्या

रिलायन्स, टाटा अन्..; अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये छाटणी, एका वर्षात 52 हजार नोकऱ्या गेल्या

गेल्या आर्थिक वर्षात अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:07 PM2024-08-19T16:07:35+5:302024-08-19T16:07:46+5:30

गेल्या आर्थिक वर्षात अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत.

Layoffs in India: Reliance, Tata etc.; layoffs in many large companies, 52 thousand jobs lost in one year | रिलायन्स, टाटा अन्..; अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये छाटणी, एका वर्षात 52 हजार नोकऱ्या गेल्या

रिलायन्स, टाटा अन्..; अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये छाटणी, एका वर्षात 52 हजार नोकऱ्या गेल्या

Layoffs in India FY24 : कोव्हिड महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका लावला होता. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या उद्भवली होती. ही महामारी संपल्यानंतर नोकऱ्यांमध्ये स्थिरता आली. पण, आता पुन्हा एकदा देशातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या कंपन्यांमध्ये रिलायन्स, टाटासह अनेक अनेक दिग्गज कंपन्यांची नावे आहेत.

कोणत्या कंपन्यांनी केले Layoffs..?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आर्थिक वर्षात केवळ रिटेल क्षेत्रात 52 हजार लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स रिटेल, टाटा ग्रुपची टायटन, रेमंड, पेज इंडस्ट्रीज, स्पेन्सर इत्यादी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या रिटेल कंपन्यांच्या वार्षिक अहवालात असे दिसून आले आहे की, त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे 52 हजारांची कपात केली आहे.

एकट्या रिलायन्स रिटेलमध्ये 38 हजारांची छाटणी
कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रिलायन्स रिटेल ही देशांतर्गत किरकोळ बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या अहवालानुसार, त्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2,07,552 पर्यंत कमी काली आहे. एक वर्षापूर्वी रिलायन्स रिटेलमध्ये 2,45,581 कर्मचारी कार्यरत होते. म्हणजेच एका आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलमधील सुमारे 38 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

टायटनमध्येही कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली 
गेल्या आर्थिक वर्षात टायटनच्या कर्मचाऱ्यांची संख्या 8,569 ने कमी होऊन, 17,535 वर आली आहे. पेज इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 22,564 झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 4217 ने कमी आहे. रिलायन्स रिटेल, टायटन, पेज, रेमंड आणि स्पेन्सरसह कर्मचाऱ्यांच्या कपातीचा आकडा तब्बल 52 हजारांवर पोहोचला आहे.

या कंपन्यांनी कर्मचारी वाढवले
दुसरीकडे रिटेल क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या ट्रेंड्समधील कर्मचाऱ्यांची संख्या 2022-23 या आर्थिक वर्षात 19,716 होती, जी 2023-24 या आर्थिक वर्षात वाढून 29,275 झाली आहे. तसेच, डी मार्टच्या कर्मचाऱ्यांची संख्या 60901 वरून 73932 झाली आहे. VMart ची कर्मचारी संख्यादेखील 9,333 वरून 10,935 पर्यंत वाढली आहे. 

Web Title: Layoffs in India: Reliance, Tata etc.; layoffs in many large companies, 52 thousand jobs lost in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.